Skip to main content

पडघम २०१४-भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 06/04/2014 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक राज्यातील मतदार कोणत्याही लाटेचा परिणाम न होऊ देता मतदान करतात असा गेल्या २५ वर्षातला इतिहास आहे.

सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम

लेखक जातवेद यांनी रविवार, 06/04/2014 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.

नाशिक सप्तशृंगी गड ट्रीप : एक अनुभव

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 06/04/2014 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच नाशिक सप्तशृंगी गडाची ट्रीप केली पुण्याहून राज्य सरकारी परिवहन मंडळाच्या बस( २* २ एशियाड ) ने नाशिक ला गेलो नाशिकहून साध्या बसने ( S T चा लाल डबा!) आधी नांदुरी मग तिथून सप्तशृंगी गडावर गेलो गडावर सोयी सुविधांचा अभावच आहे भक्तनिवास आहे पण त्यांची निट देखभाल होत नाही हे लगेच कळून येत होते खोल्या स्वछ नव्हत्या तसेच त्याच्या आवारातच (passage मध्ये)लोक आपापल्या पथाऱ्या पसरून झोपत होते प्रसादाच्या जेवणाची सोय त्यामानाने बरी होती सर्वत्र अस्वच्छता,धुळीचे साम्राज्य आणि पचापचा थुंकणारे लोक यांचा अक्षरश: वैताग येत होता तिथले stalls पाहून 'देऊळ ' picture ची आठवण झाली शक्य असेल त

शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

लेखक फारएन्ड यांनी रविवार, 06/04/2014 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा.

अंगलट आलेले प्रकरण

लेखक खटपट्या यांनी रविवार, 06/04/2014 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
श्री शशिकांत ओक यांच्या http://www.misalpav.com/node/27497#new या धाग्यावरून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा केलेला प्रयत्न १९९५/९६ ची गोष्ट असेल. मी एका सहकारी बँकेत आय टी विभागात होतो. त्यावेळेचे बँकिंग चे माहिती तंत्रज्ञान आगदीच बाळबोध होते म्हणायला हरकत नाही (नेट्वर्किंग च्या दृष्टीकोनातून) सर्व शाखा एकमेकांशी जोडलेल्या नव्हत्या. प्रत्येक बँकेचा आय टी सेट अप स्वतंत्र असे. त्यामुळे प्रत्येक शाखेत एक किंवा दोन शाखांमध्ये मिळून एक असा आय टी चा माणूस नेमलेला असे. मी ज्या शाखेत होतो त्या शाखेत तर आठवड्याला एखाद दुसरा प्रोब्लेम येत असे.

कचरा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 06/04/2014 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे कचराच कचरा. विदेशी कचरा जास्तस आवडतो कचऱ्याची दलाली आम्ही आनंदी घेतो. पडणारी विमाने असो कि जंग लागलेली जहाजे किंवा बुडणाऱ्या डुब्या देशाची सुरक्षा सुद्धा करतो विदेशी कचरा . सडलेल्या द्राक्षांचा सुवास दरवळला झिंगून डुक्कर कचऱ्यात पहुडला परमानंदी टाळी तयासी लागली. कचऱ्याचा जयघोष आकाशी दुमदुमला.
काव्यरस

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ८

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 06/04/2014 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे ५.०० मार्को कन्फर्टोला, विल्को वॅन रूजेन आणि जेरार्ड मॅक्डोनेल उजाडण्याची वाट पाहत एकमेकाला चिकटून बसले होते. खाली जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. गेले ३६ तास ते २६००० फूट उंचीवर डेथ झोनमध्ये वावरत होते, त्यामुळे लवकरात लवकर खाली न उतरल्यास आपल्याला पल्मनरी आणि सेरेब्रल एडेमा आणि फ्रॉस्टबाईट होण्याची शक्यता आहे याची तिघांनाही कल्पना होती. पूर्वेला दिवस उजाडण्याची चिन्हं दिसू लागताच कन्फर्टोला, रूजेन आणि मॅक्डोनेलने हालचाल करण्याचा निर्णय घेतला.

मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 06/04/2014 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल १) मराठी ब्लोगरस कमी झाले २) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद ३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक

2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे! - हरवले ते गवसले का?

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 06/04/2014 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

संतापजनक भाऊबंदकी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 05/04/2014 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्‍या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले. ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी.