४ आकड्यांचा प्रवास...
४ आकड्यांचा प्रवास...
ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. तशी कारण बरीच आहेत तिथे मिळणारी मोकळीक, झोपायला मिळणारा बर्थ वगैरे वगैरे. काही छोटे त्रास पण आहेत पण त्यात माझ्या कुंडलीचा दोष आहे रेल्वेचा नाही. काही गोष्टी नेहमी ठरलेल्या असतात, मी आज पर्यंत शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून म्हणजे बुकिंग केलेल्या दिवसापासून मला कन्फर्म सीट मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरीहि माझा नंबर वेटिंगमध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा.
मिसळपाव