ये क्या जगह है दोस्तो
श्री.गोरा सौमित्र यांच्या " प्रलयानंतरची प्रार्थना" या लेखा (ते कथा म्हणत असले तरी मी गद्यकाव्यच म्हणतो) वरचे प्रतिसाद वाचल्यावर मला आठवण झाली ती
ये क्या जगह है दोस्तो, ये कोनसा दयार है ?
हद्दे निगाहतक जहॉं गुबारही गुबार है !
मित्र हो, आपण मिपावर लिहितो तेव्हा आपण एमेचा पेपर सोडवत नसतो, सेमिनारमध्ये वाचावयाचा निबंधही लिहित नसतो, नाही सत्यकथेत प्रकाशित व्हावी अशी कविता. आपली छायाचित्रे नॅशनल जीओग्राफित प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेची नाहीत हे आपल्याला माहीत असते. निदान माझी तरी अशी समजुत आहे.