गाकर (हारोळ्या)
गाकर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ. आम्ही देशावरील मंडळी याला हारोळ्या म्हणतो.
जाडसर कणिक थोडे मोहन, थोडे जास्त मीठ आणि ओवा घालून भिजवायची. दहा मिनिटे कणिक मुरवायची आणि लाटून साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या पण चार मिलीमीटर जाडीचा गाकर लाटायचा. एकाबाजूने तव्यावर शेकायचा आणि दुसर्या बाजूने अर्धवट तव्यावरच शेकायचा. नंतर अग्निमध्ये (ग्यासच्या चुलीवर. खर्या चुली तर आता गावात पण नसतील..)मस्त खरपूस हि हारोळी भाजून घ्यायची. वरून भरपूर साजूक तूप टाकायचे आणि तोंड शेकत शेकत खायची. Alternatively तुम्ही हि बटर किंवा घरातल्या ताज्या लोण्याबरोबर पण खाऊ शकता.
मिसळपाव
साहित्यः
१. रवा - १ वाटि
२. साजुक तुप - पाव वाटि
३. ताजा मँगो पल्प - १.५ वाटि (नसेल तर टिन्ड/कॅन मधला वापरु शकता पण चवीत फरक पडेल)
४. दुध/पाणी - १ वाटि प्रत्येकि
५. चवीनुसार साखर (आंब्याच्या गोडिनुसार)
६. बारीक चीरलेले बदाम/पिस्ते
७. पाव चमचा वेलचीपुड
कॄती:
१. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तुप तापलं कि रवा खमंग भाजावा/परतावा
२. एका भांडयात १ वाटि दुध आणि पाणी एकत्र करुन उकळि आणावी
३.