Skip to main content

मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/05/2013 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अ‍ॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे. मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं.

रक्त आटते जनतेचे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/05/2013 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला

फुस्स...

लेखक आतिवास यांनी रविवार, 12/05/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तुमामा आलेत. म्हंजे आमच्या आत्याचा नवरा. आमच्या तीन आत्या. एक पुन्याची. हे तिचे नवरे. दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं. तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई. म्या तिला बघिटलीचं न्हवं. दत्तुमामा खाऊ आन्तेत. म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला. आय चा करत व्हती. म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया. दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?” दर बारीला हेच विचारतेत. दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते. आताशिक सकरात आली जवळ. मंग आताबी पयलीतच –हाणार की! म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला” दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”. येकदम फुस्स ! हे आयकत न्हाईत कायी.

दारु पुराण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 12/05/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥ रोज येतो दरु पिऊन बाटली खिशामद्ये घेऊन सांगे रुबाबात येऊन चल वाढ मला भोजन रोज हवी मच्छी मटण बायको आण्ल सांगा कुठुन रागाने ऊठतो पेटून अर्ध्या जेवणावर ऊठुन होते त्याची चालू,ही बडबड आता ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥ मुले कावरीबावरी होऊन आईच्या पदराखाली लपून ऊपाशी पोटी जाती झोपून याची थोडीही नाही त्याला जाण आई त्यांची कष्ट करुन देई मुलांना चांगले शिक्षण मुलेही हुशार आणि गुणवान फेडतील आईचे त्यांच्या ऋण मुलेच खरी तिची संपत्ती व सत्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥२॥ दहा तारखेला होतो पगार जमे सारा मित्र परिवार दरु पिऊन चाल
काव्यरस

रंगोली

लेखक सचिन कुलकर्णी यांनी रविवार, 12/05/2013 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी दूरदर्शनवर रंगोली नेमाने बघायचो. तेव्हा केबल TV हा प्रकार अस्तित्वात नव्हता. नंतर तो कार्यक्रम रटाळ व्हायला लागला (छायागीत आणि चित्रगीत प्रमाणेच). आणि दरम्यान केबल TV चे आगमन झाले. केबलचे आगमन झाल्यावर रविवारचे रंगोली पूर्णपणे सुटले.. (एक अरसे बाद ) ऐन (गद्धे) पंचविशीत माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. गर्लफ्रेंड का काय म्हणतात तशी. त्यांच्या घरी केबल नव्हते. ती रंगोली नेमाने बघायची आणि तिचा तो favorite कार्यक्रम होता. (तोवर गुणवत्ता परत सुधारली होती कार्यक्रमाची - चांगली गाणी, आपकी फर्माईष,वैगेरे). तिच्या नादाने मी रंगोली परत बघायला लागलो.

तळलेले फणसाचे गरे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/05/2013 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
....बरेच दिवस मनात होतं या प्रकारा बद्दल माहिती देण्याचं. अता तसं पहायला गेलं तर या पाककृतीला फारशी मोठ्ठी कृती नाह्हीच आहे.पण तरिही मी माझ्या भावाच्या सासुरवाडीला (पावसला) त्यांच्याकडे गरे विकतात हे कळल्यावर, एकदा गेल्यावर पाहिनच कसे करतात ते... असं ठरवल होतं. गेल्यावर्षी अशीच एक उडती ट्रीप तिकडे घडली होती.तेंव्हा मी माझ्या सवयी प्रमाणे याचं व्होडिओ चित्रण (खास माझ्या पद्धतिने) करुन ठेवलं होतं. त्यात काल ख.फ.वरती गर्‍यांचा विषय हीटवर आलावता..मग म्हटलं, ही पाककृती प्रोफेशनली तयार करणारे श्री.मुरलीधर पंडीत यांना आपण ती इथे टाकुन त्यांनाच-प्रेझेंट करू.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०८ : क्विन्सटाउन (न्युझीलंड) ते मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 11/05/2013 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

विक्रांत वरील आयुष्य ३

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 11/05/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रांत वर असताना एक दिवस एक परमजीत सिंघ अमर नावाचा साधारण पंचे चाळीशीचा सरदारजी अधिकारी माझ्याकडे आला त्याच्या हातात एक कोणता तरी फॉर्म चा कागद होता. आणी तो मला विचारु लागला कि डॉक्टर तुम्हाला वेळ केंव्हा आहे? मी विचारले कशासाठी? त्यावर तो म्हणाला कि माझ्या मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र हवे आहे. मी परत विचारले कशासाठी? त्यावर तो म्हणाला कि वाराणसी पासून पाटण्या पर्यंत दोनशे किमी गंगा नदीत पोहण्याची स्पर्धा आहे त्यात भाग घेण्यासाठी त्याला स्वास्थ प्रमाणपत्र हवे आहे. मी परमजीत सिंघ न विचारले तो आपला स्वतःचा मुलगा आहे का? त्यावर ते होय म्हणाले.