Skip to main content

ती आणि तो

लेखक भागो यांनी गुरुवार, 29/12/2022 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
ती नेहमी प्रमाणे येत होती. संध्याकाळचे सहा वाजले. भेळवाल्याने मनातल्या मनात नोंद केली. ती हळूहळू चालत नेहमीच्या बाकड्याकडे जाते. तिच्या चालीत काहीही विशेष नाही. आठ महिन्यापूर्वी जशी आली होती तशी ती दररोज येते. आठ महिन्यापूर्वी उत्साह होता. चालण्यात डौलदार संथपणा होता. उत्सुकता होती. हुरहूर होती. आशा आणि भीति यांचा पाठशिवणीचा खेळ आता त्या भावनाही विरून गेल्या होत्या. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते. अस केव्हातरी अल्लड बोलणे झाले होते. तेच निभावते आहे. वूडस आर लवली डार्क अॅंड ग्रीन बट आय हॅव प्रोमिसेस तो कीप. केवळ म्हणून ती येते. हाच तो बाक.

जन्मजात दुखणे येता (३) : ओठ व टाळू

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 28/12/2022 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे गर्भावस्थेच्या चौथ्या ते सातव्या आठवड्यादरम्यान ओठ तयार होतात. किंबहुना या काळातच खऱ्या अर्थाने चेहरा तयार होत असतो. ही प्रक्रिया होत असताना जर संबंधित पेशीसंयोगात काही बिघाड झाले तर बाळाचा वरचा ओठ दुभंगलेला राहतो. ओठाला पडलेली फट काही वेळेस छोटी असते तर अन्य काही वेळेस ती मोठी होऊन थेट नाकात घुसलेली असते. ह्या प्रकारचे दुभंगणे शरीराच्या एका किंवा दोन्ही बाजूंनाही असू शकते.

जावे IT च्या डिपार्टमेंटा

लेखक kool.amol यांनी मंगळवार, 27/12/2022 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे?

खेळसारीचा खेळिया

लेखक भागो यांनी रविवार, 25/12/2022 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
खेळसारीचा खेळ खेळसारी तुम्हाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माहित असणार. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव. त्याला गाव म्हणणे बरोबर नाही. जून महिन्यात पाउस सुरु होतो. त्या पावसाला लोक मान्सून म्हणतात. पेपरात तुम्ही वाचलं असणारच, “खेळसारीला मान्सूनचे आगमन!” खेळसारीला मान्सूनची पहिली चाहूल लागते. तिथे पाउस सुरु झाला कि समजायचं कि अजून ठीक चार दिवसांनी मुंबईला पाउस सुरु होणार. आणिक सात दिवसांनी पुण्याला पावसाची पहिली सर येणार! कमाल आहे ना. ढगांना ही बुद्धी कुणी दिली? त्यांना कसं समजत कुठं केव्हा जायचं, किती पडायचं? खेळसारीला एकदा का पाउस सुरु झाला कि तो मग चार महिने नॉनस्टॉप चालूच राहतो.

दिस सरतो असा...

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 25/12/2022 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला. दिस मेघापरी झरुन चालले दिस वाळूपरी सुटून चालले दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला. दिस गंधापरी विरून चालले दिस रंगापरी पुसून चालले दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला. दिस आले कधी सोबती घेउनी दिस गेले कधी एकटा सोडुनी दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला. दीपक पवार.

कोलाहल !

लेखक फिझा यांनी रविवार, 25/12/2022 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोलाहल ! सायकलची बेल, दुचाकी चारचाकी चे हॉर्नस ट्रक चे कर्कशः ब्रेक, वेगाचे आवाज ट्रामच्या दाराची उघड झाक , हेलिकॉप्टरची झार झार ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वरची अनाउन्समेंट , मधेच ऍम्ब्युलन्स चा सायरन , सगळीकडे गडबड, धांदल, गोंगाट,किलबिलाट !

शब्द कल्लोळ

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 25/12/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द कल्लोळ! शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने, (अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई. गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत. अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.      'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!

अंतर्गत सीमावाद (भाग-२)

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 24/12/2022 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली.

हरंगुळचं "हरहुन्नरी" शिक्षणकेंद्र

लेखक मार्गी यांनी शनिवार, 24/12/2022 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट ✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव ✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा! ✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव! ✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक ✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य! ✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट सर्वांना नमस्कार. लातूरजवळच्या हरंगुळ इथे असलेल्या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये तीन दिवस राहण्याचा योग नुकताच आला. आदरणीय प्रकाशजी लातुरे व श्री.

(झाली किती रात सजणी...)

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 24/12/2022 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून.... (आली जरी रात सजणी...) आली जरी रात सजणी झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे. अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे. खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे. बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.