रंगबिरंगी भूछत्रं
मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. चेन्नैच्या भयंकर उकाड्यावर हा उतारा एकदम कातिल होता.
पहिल्या दिवशी सकाळी सकाळी 'कोकर्स वॉक' नावाच्या साधारण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एक रपेट मारून 'साईटसिइंग'ला सुरुवात झाली. त्यानंतर एक जंगलातला ट्रेल होता. सुरुच्या बनातून असलेला एक मस्त ट्रेल.
मिसळपाव