या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"...
================================================================
तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची?
सामग्री :: (२ जणांसाठी)
मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल.
कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या.