मुलगी का नको?
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.
० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्या खर्चाचा मुलगी वाढविणार्या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही.
मिसळपाव