माझे नावडते संगीतकार
आजच प्रवास करत असताना अचानक बसवाल्याने एफेम रेडियो लावला. त्यातल्या चरपटपंजरीचा त्रास कमी का काय म्हणून चरपटणारीने 'आज राजेश रोशनजी का बर्थ डे है' असे सांगून सगळी राजेश रोशनची गाणी लावली. त्यामुळे असह्य मानसिक ताप झाला. त्यातूनच ही कल्पना सुचली की आपले नावडते संगीतकार आठवावेत. पूर्वी कोणीतरी, आवडते संगीतकार, यावर कौल घेतला होता. म्हणून कौले काढायला गेलो तर 'पर्याय वाढवा' हे दाबल्यावर पुढचे सगळे इंग्रजीतच टाईप व्हायला लागले. बरीच खटापट केल्यावर विचार केला, की मग हा विषय चर्चेलाच टाकावा. मला नावडणार्या संगीतकारांची नांवे उतरत्या क्रमाने दिली आहेत.
मिसळपाव
![Img00033[1]](http://farm6.static.flickr.com/5069/5757465576_6b30e7630f_z.jpg)