जैतापुर प्रकल्पाचा गुंता
कोणताही प्रकल्प एखाद्या ठिकाणचे लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. स्थानिक लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणशी एवढे जवळचे संबंध व नाती निर्माण झाली की, सहजासहजी स्थनिक रहीवाशी आपली जमिन व घरेदारे आणि शेतीवाडी देण्यास तयार होत नाहीत. यामुळेच महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एखाद्या प्रकल्पाबाबत लोकांनी विरोध केला नाही, असे घडलेले नाही. सेझ विरोधात रायगडमध्ये शेतक-यांनी लढा दिला आणि जमिन संपादन करणे अशक्य केले. यामुळेच सरकारला सेझची योजना गुंडाळून ठेवावी लागली. प्रकल्पामुळे जनता विस्थापीत होते आणि एकदा विस्थापीत झाली की, मग या प्रकल्पग्रस्तांना किंवा धरणग्रस्तांचा वाली कुणीच रहात नाही.
मिसळपाव