Skip to main content

कां?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 28/02/2011 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी संतान त्या अनादी अभोगी निर्मात्याचे कां असावे भय मजला कुणा भोगी मानवाचे ? मी चालतो धरुन कास सदा सत्याची कां बाळगावी भिड कुणा चित्रगुप्ताची ? मी प्रवासी त्या लखलखत्या मद्ध्यांनीचा कां असावा छंद मजला काळोख्या रात्रीचा ? जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ? जन्मजन्मांतरीचा दास त्या अनादी अनंताचा कां छळावा श्रावण मजला माझ्या गतजन्माचा ? आधार मज असे जगनियंत्याच्या शाश्वत वचनाचा कां असावा अविश्वास अंतरी या अफाट विश्वपसार्‍याचा ? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/१०/२०१०)

राष्ट्रीय विज्ञान दिन

लेखक अवलिया यांनी सोमवार, 28/02/2011 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी सध्या मिपावर मराठी दिन जोरात चालू आहे. तसेच सर्वत्र मराठीचा जय घोष चालू आहे. मराठी पुन्हा एकदा सर्वत्र मानाचे स्थान पटकावणार याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. आज राष्ट्रीय विज्ञान दिन. यानिमित्ताने सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा ! आणि जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती मराठीत यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सुचवून तसा प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची प्रतिज्ञा या निमित्ताने करुया असे मला वाटते. जय ज्ञान ! जय विज्ञान !
विशेष

स्वसंपादन आणि वाचनखूणांची सोय देण्यात येत आहे.

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 28/02/2011 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज पासून मिपाकरांना आपण लिहीलेल्या लेखात बदल करण्याची म्हणजेच स्वसंपादनाची सोय देण्यात येत आहे. मात्र ही सोय त्यांनी काही तांत्रीक सुधारणा करण्यासाठीच वापरावी ही विनंती आहे. आपल्या लेखाचा आशय बदलावा असे बदल करू नये. त्यामुळे मूळ लेखाच्या आधारे खाली झालेल्या चर्चांतील प्रतिक्रिया अवाजवी ठरतील व अन्य सदस्यांचा हिरमोड होईल. त्यामुळे स्वसंपादन ही सोय अत्यंत जवाबदारीने वापरावी. तसेच असा आशय बदलण्याचा प्रकार घडल्यास तो लेख मूळ स्वरूपात परत प्रकाशित करण्याचा अधिकार व शक्यता मिसळपाव.कॉम राखून ठेवत आहे.

एक किस्सा...

लेखक देव बप्पा यांनी सोमवार, 28/02/2011 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास २ वर्षा पासून मिपाचा फॅन... पण एवढ्या मोठ्या माणसात लिहायच आणि प्रतिक्रिया देयाची हिंमत होत नव्हती.. शेवटी ठरवल आणि थोड्याच दिवसपुर्वि. हिंमत करून अकाउंट खोलून आपल्या मिपा परिवारात ..खर्‍या आर्थाने प्रवेश केला..आणि आपल्या कुटुंबाचा सदस्य झालो.. मझा हे पाहिलच लिखाण...

हरवलेली डायरी...

लेखक निनाव यांनी सोमवार, 28/02/2011 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
ती जुनी डायरीच सापडत नाहिये आज मला बघितली आहे का कुणी? इथेच तर ठेवली होती मी.. खिडकी जवळ, रायटिंग टेबल वर काल रात्री निजण्या पुर्वी... काल रात्र खूपच हवा होती अन खिडकी राहिली होती उघडी खोली तर गार पडली होतीच अन मला अशी काय झोप होती लागली... कुणास ठाउक काय घडले रात्री न कळले मज काही किती पानं फड्फडली असतील वार्यानं वाचले गेले असेल सर्व काही... माहीत नाही काय काय हरवले आहे त्या डायरी सोबत... जुने पत्ते होते काही.. आणि काही नावं विसरु नये कधीच.. त्या साठी लिहिलेली.. आत्ता आठ्वत नाहीत नीट..

ते झाड..

लेखक निनाव यांनी सोमवार, 28/02/2011 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर होते एक झाड पिंपळाचे.. ते भेटायचा मला रोज.. मी ही थांबून कधी दोन शब्द बोलयचो त्याच्याशी लांबूनच बघायचे ते मला येतांना अन त्याची पानं हालायची.. मज अभिनंदनच जणू काही अन जवळ पोहोचताच एक थंड झुळुक वार्याची माझा घाम पुसायची असेच बघत भेटत राहिलो आम्ही कित्येक वर्ष..अविरत घरोबा खूपच वाढला होता तोवर भेटावयास कधी मग.. तिच्या आठवणींना ही घेउन जायचो सोबत कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट.. मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने अन, त्याने बघितले माझे केसांचे रंग बदळणारे नोकरी निमित्त, सोडावे लागले मग शहर मला अन घेतला मी त्याचा निरोप

साम्य

लेखक चित्रा यांनी सोमवार, 28/02/2011 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
नॅशनल जिऑग्राफिकमधील (फेब्रुवारी २०११) 'अंडर पॅरिस' या लेखामुळे आणि त्यातील काही छायाचित्रांमुळे सुचलेले हे मुक्तक.
काव्यरस

लेमन ड्रिझल केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 27/02/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १७५ ग्राम साखर २ अंडी फ्रिजमधुन बाहेर काढुन ठेवणे १५० ग्राम मारगरीन किंवा तूप एका लिंबाचे किसलेले साल १७५ ग्राम मैदा १२५ मिलि दूध लेमन सिरप चे साहित्यः १४० ग्राम पिठीसाखर ५० मिली लिंबाचा रस पाकृ: १८० डिग्री वर ओव्हन गरम करायला ठेवणे.