Skip to main content

न लगे कोठे, शोधे तुज माझे मन

लेखक एकमाणुस यांनी शनिवार, 12/02/2011 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
न लगे कोठे, शोधे तुज माझे मन न दिसे काही, दिसे तुझे ते नयन तु नाही तर कुठे आहे सागर तु नाही तर कुठे आहे तरंग एक एक थेंब वाहतो जसा वाट पहाते तुझी माझे जीवन न लगे कोठे, शोधे तुज माझे मन... तु नाही तर कुठे आहे सुख तु नाही तर कुठे आहे चैन एक होण्यास धावते बरोबर नदी काठ होते जसे बेचैन न लगे कोठे, शोधे तुज माझे मन.. तु नाही तर कुठे आहेत तारका तु नाही तर कुठे आहे आसमंत क्षितिजा वर मिळेल धरा जणू मज मिळेल का तुझे आलिंगन न लगे कोठे, शोधे तुज माझे मन न दिसे काही, दिसे तुझे ते नयन....!!

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 12/02/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
रामपूर हे एक छानसे छोटेखानी गाव होते. त्या नगरात राम कुमार नावाचा जादूगार राहत होता.राम कुमारला भाऊ तीन-- लक्ष्मण कुमार,भरत कुमार आणि शत्रुघ्न कुमार. तर सीता कुमारी ही त्याची पत्नी. राम कुमारकडे एक विलक्षण कौशल्य होते.त्याला जादुच्या छड्या तयार करता येत असत.आणि या छड्या साध्यासुध्या नव्हत्या.तर ती छडी ज्या मालकाकडे असेल त्या मालकाच्या बॅंक खात्यात ती छडी जगाच्या अंतापर्यंत दर वर्षाच्या १ जानेवारीला १०० रूपये आपोआप जमा करत असे. राम कुमारकडे अशा अनेक छड्या होत्या आणि त्यातून त्याला भरपूर पैसे मिळत असत.

संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास

लेखक स्नेहल राव यांनी शनिवार, 12/02/2011 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती. सुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली.

मटार उसळ

लेखक मितालि यांनी शनिवार, 12/02/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी मटार , १ बटाटा, १०-१२ काजूगर,३-४ लवंगा, २ तुकडे दालचिनी, ३-४ मिरी,१-२ वेलची, १ वाटी ओले खोबरे,१/२ वाटी कोथिंबिर, ३-४ हिरव्या मिरच्या, छोटीशी चिंच, मीठ, १/४ चमचा साखर, २ चमचे तेल, पाणी, १/४ चमचा धणेजीरेपूड. कृती: बटाटयाच्या चौकोनी फोडी,मटार व काजुगर एकत्र शिजवुन घ्या. ओले खोबरे, वाटी कोथिंबिर, चिंच, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर मिक्सर मध्ये वाटुन हिरवी चटणी बनवुन घ्या. तेलात लवंग, दालचिनी, मिरी,वेलची यांची फोडणी बनवा. यात हिरवी चटणी,धणेजीरेपूड व पाणी घालुन शिजवुन घ्या. नीट शिजली ग्रेव्ही की शिजलेले बटाटे,मटार व काजुगर घालुन एक उकळी येऊ द्यावी.

'च'

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 12/02/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
'च॒' हिच्या॒त च, तिच्या॒त च ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥ च॒ळवळीत च मोर्च्या॒त च वच॒ननाम्यात च प्रचा॒रात च खुर्ची॒त च बाचा॒बाची॒त च राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥ भ्रष्टाचा॒रात च लाच॒खोरात च चा॒रा घोट्याळ्यात च जकातीच्या च॒लनात च बच॒त गटात च ब्यांकेच्या चे॒कात च चा॒लू खात्यात च पैशांशीही 'च' चे खूप छान जमते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥ च॒कलीत च च॒टणीत च चि॒वड्यात च चा॒ट मसाल्यात च चिं॒चेत च चि॒कण्या सुपारीत च जीभेच्या चो॒चल्यात च च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते 'च' अक्षर देशा
काव्यरस