लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असते..........
आदर्श म्हणॆ लवासाला
तु किती लाखाचा
तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला
तु किती कोटीचा
एक घोटाळा म्हणे दुस-याला
काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
लाखाचा असो वा कोटीचा
तुमचे आमचे सेम असते
अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली.
मिसळपाव
