Skip to main content

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

फाशीपेक्षा काही अजून?

लेखक गवि यांनी मंगळवार, 16/11/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधी नुसतीच माहिती..गायीची माहिती असते तशी.. अफगाणिस्तान,बांगलादेश, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, भारत, इराण, इराक, जपान, कुवेत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, अमेरिका, विएतनाम, येमेन हे सर्व देश मृत्युदंड देतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान या सर्व देशांनी मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून काढून टाकली आहे. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी फाशी रद्द केली आहे असे एकूण देश : ब्याण्णव. फक्त स्पेशल गुन्ह्यांसाठी फाशी राखून ठेवली आहे असे देश: दहा..

नाग !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! *

क्रांतीकारी कुटुंब !!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 16/11/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात एक क्रांतीकारी कुटुंब आहे. त्या कुटुंबाची, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणुन या लेखाचा प्रपंच. त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडील यांनी अनेक कुटुंबांना पोलीओ चे महत्त्व समजावून सांगितले आहे. अनेक जाहिरातीत सुद्धा ते अधून मधून विविध वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावतात. तसेच सध्या एका कार्यक्रमाद्वारे ते अनेकांना करोडो रुपये वाटत आहेत. खुप साधे सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन विचारुन ते अनेकांना श्रीमंत बनवत आहेत. तिथे जायचा कंटाळा असेल तर घरीच बसून तुम्ही लखपती सुद्धा होवू शकता बरे का, लोकांनो! याहून पैसे मिळवणे सोपे ते कसे असू शकेल बरे? म

मठ्ठपणाचा भाव असणारी दुपार !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुस्त अशी दुपार उगवली आहे सगळे शरीर सुस्तीने भेंडाळुन यावे अशी दुपार ...! सर्वत्र सुन्न असे वातावरण माणसाच्या जमावाला पण ओहोटी लागलीय सगळीच पेंगत डुलकीच्या नशेत ... कान नि मन सुन्न व्हावे असे वातावरण वटवाघळ!

दि. १७ नोव्हेंबर, सिंह राशीतला उल्कावर्षाव!

लेखक असुर यांनी मंगळवार, 16/11/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, उल्कावर्षावावर लिहून बरेच दिवस झाले. अदितीतै, चतुरंगकाका आणि घासकडवी गुर्जींनी सुचवल्याप्रमाणे त्यात अजून थोडी भर घालायचा हा एक प्रयत्न! उल्कावर्षाव पहायचे अनेक मौके वर्षभर आपणास मिळतच राहतात. पण काही उल्कावर्षाव असे असतात की ते टाळून किंवा चुकवून चालतच नाही मुळी! अशाच प्रसिद्ध वर्षावांपैकी एक म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव! १७ नोव्हेंबर ही त्या उल्कावर्षावाची मुख्य तारीख मानली जाते.