Skip to main content

तुम्ही कधी न खाल्लेला ऐकलेला पदार्थ - ---नाकारड्...

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 14/10/2010 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदिता ताईंचा विस्मरणात गेलेले पदार्थ वाचला अन मग फार दिवसापासून लिहीन लिहीन म्हणतेय तो पदार्थ 'नाकारड' आज लिहायचा घाट घातला. हा पदार्थ मी माझ्या घरा व्यतिरिक्त कोठेही ऐकला सुद्धा नाही. चाखन तर दूरच ! त्यामुळे एका प्रकारे मी माझ्या घरातली सिक्रेट रेसिपी इथे देते आहे. तुम्हा कोणाला माहीत असेल असं अजिबात वाटत नाही. माहीत असेल तर 'चू चू' च गजराच घड्याळ बक्षिस !! हा पदार्थ काकड्यां पासून बनवतात. मागे प्रियालि कडे खुप काकड्या झाल्या अस ऐकल , घ्या त्यातल्याच दोन!! आता काकडी म्हंटल की मला हसायच्या उकळ्यावर उकळ्या फुटतात. का?

युगलगीत: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/10/2010 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली
हिरो: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली बसली ग बसली, कोपर्‍यात जावून बसली हिरो: तूला प्रफुल्लची साडी आणू का ग? तूला नवा मोबाईल घेवून देवू का ग? तूला कसला कंटाळा आलाय का ग? मग टिव्हीवर 'सासबहू' बघ ना ग हिरवीन: जावा तिकडं नका येवू इकडं नशीब माझं फुटकं काय वस्तू देता असली कसली? कशी वेळ माझ्यावर आली हिरो: आत्तां?
काव्यरस

टीन एज वारे वाहू लागलंय !

लेखक अथांग यांनी गुरुवार, 14/10/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
परत एकदा टीन एज वारे अंगातून वाहू लागलंय, हुरहुर-धडधड असे राग मन- वेळी-अवेळी गाऊ लागलंय ! भेटण्याची वेळ ठरवून-बिरवून स्वप्नरंजन होऊ लागलंय, समोरा-समोर आल्यावर मात्र- लाजून लांबच राहू लागलंय ! डोळ्यात चमक, ओठांवर शिट्टी.. पाऊल तिच्याच तालात पडू लागलंय, चेहरा न दिसता हसरा तिचा, मन हिरमुसून रडू लागलंय ! लपाछपीचा नवा खेळ खेळण्यात कोण कोण बघा रमू लागलंय.. मधेच 'आउट' होण्याच्या भीतीने माझं रक्त गोठून जमू लागलंय ! टीन एजचं जगच न्यारं.. आत्ता परत पटू लागलंय.. धपापलेल मन नकळत, मागे-मागेच हटू लागलंय..:(

(गावात प्लेग)

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 13/10/2010 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
सार्‍या उदास वाटा, कापीत चाललो मी होउन मूषक काळा, शापीत चाललो मी नाले गटारे अनेक, सुगंधी या पथाने, ओल्या ओघळांत काही, हुंगीत चाललो मी वस्ती उठून गेली, ओसाड ती कवाडे, तो घास नासलेला, शोधीत चाललो मी, काखेत एक गाठ, आक्रोश आणि टाहो, मृत्यो तुझ्या तमाच्या धुंदीत चाललो मी. पसरला प्लेगपाश, दूषीत आसमंत, प्रतिशोध मानवाचा भेदीत चाललो मी. ( खूप दिवसांनी एकाच कवितेवर विडंबने पडताना पाहिली आणी रहावलं नाही.. खुप दिवस काहीच लिहायला वेळ मिळाला नाही म्हणुन जरा हात आणी कळफलक साफ करून घेतोय.. )
काव्यरस

हेमंत

लेखक मराठे यांनी बुधवार, 13/10/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर जाउन ऑक्टोबर येतो न येतो तोच थंडी जाणवायला लागली आहे. थोड्याच दिवसांत घराबाहेर फिरायला जाणं मुश्किल होइल. पण काल आमचे ग्रह एकंदरीत बरे असावेत. काल बर्‍याच दिवसानी थोडा निवांत वेळ मिळाला होता, आणि मुख्य म्हणजे थंडी बेताची होती. ऑफिसमधून घरी येतानाच ठरवलं की आजचा दिवस फुकट घालवायचा नाही . घरी आल्या आल्या मुलाला व हीला घेउन बाहेर पडलो. (ऑफिसमधुन येउन चहा पिउन, खाउन मग जाउया म्हटलं की निघे-निघेपर्यंत काळोख पडतो हा मागच्या वेळेचा अनुभव होता.) "हेरिटेज पार्कमधे जाउया" छोट्याची फर्माईश आली. आणि पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी त्यादिशेला वळवली.

(शापीत मेघ ) ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 13/10/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
आदिती आणि अडगळ यांच्या प्रेरणेने. सारे बोबाट शब्द, फेकीत चाललो मी सोडुन सार्या वाटा, का पीत चाललो मी ? रिचवुनी अनेक प्याले, रातीचे ओसाड नाले अडखळीत का असेना, धुंदित चाललो मी रात्रीत विरले दु:ख, सरलेली सारी स्वप्न झुगारुन लक्ख नभास , ऐटीत चाललो मी झाले आप्त ही परके, रक्तबंध विस्कटलेले नजरेच्या तप्त ज्वाला, सोशीत चाललो मी डागाळलेला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी
काव्यरस

गुजरातच्या निवडणूकांतून जनतेचा कौल

लेखक विकास यांनी बुधवार, 13/10/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
कालच (ऑक्टोबर १२) ला गुजरात मधील अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, भावनगर, आणि जामनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५५५ जागांपैकी दोन तृतियांश जागा ह्या "मोदीं"च्या भाजपाला मिळाल्या. "मोदीं"च्या म्हणण्याचे कारण असे की भाजपात अंतर्गत भांडणे (मोदींविरुद्ध देखील) चालू होती, माध्यमे आणि काही स्वयंघोषित सेक्यूलर संस्था / व्यक्ती यांनी मोदींच्या विरुद्ध सततच आगपखड केली आहे, त्यांच्या विरुद्ध मला वाटते दंगलींसंदर्भात (व्यक्तीगतपण) खटले चालू आहेत.

विस्मरणात गेलेले पदार्थ--------- १)डांगर...............

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 13/10/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे. दही एक वाटी, फोडणीचे साहित्य. थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा.लाल तिखट, मिठ. कॄती:- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे.