Skip to main content

शब्दचित्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 17/02/2022 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्र धवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन ,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची आशा हीच उद्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची

रिमझिमत्या धारातून आलीस.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 17/02/2022 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिमत्या धारातून आलीस होऊनिया चिंब मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब. मातीस स्पर्शती धारा गंधात नाहते धरा तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध. पापण्या मिटून दूर लाजून जाहली चूर थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब. दाटले मनी काहूर डोळ्यात साठला पूर उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?
काव्यरस

परदेशवारी-२

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 16/02/2022 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
दुर राहाणाऱ्या लोकांचा "भावनिक भागांक"(Emotional quotient) हा जवळपास राहाणाऱ्या लोकां पेक्षा जास्त आसतो.हा सैन्यातला स्वानुभव, कायमच घरापासून दूर,वर्षातून एकदाच काय ते सुट्टीवर जायचे, त्यामुळेच दूर राहणार्‍या मुलांना काय वाटत असेल याची जाणीव ठेवूनच सामानाचे नियोजन केले होते. शिकागोला पोहोचल्या नंतर सकाळपासून मुलांच्या मीत्र मैत्रिणीचे फोनवर फोन, 'आले का आई बाबा?फ्लाईट वेळेवर आली ना!" वगैरे. बरोबरच आम्ही आल्याशिवाय सुटकेस उघडाल तर बघुन घेऊ आशी प्रेमळ धमकी पण देत होते. करोनामुळे नाईलाजास्तव एक आठवडाभर थांबावेच लागले. घरातच क्वारटाइन होतो.

आशा

लेखक निनाद यांनी बुधवार, 16/02/2022 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
नौका ही बांधलेली राहील का बांधलेली उरात भरूनी वारे ही पाहतो निघालेली वादळे येती तरी लाटा फोडून ती गेली थांबलो तेथेच मी ती निघून गेलेली मी असेन येथेच वेळ नाही गेलेली परत कधी येईल ती आशा न विझलेली
काव्यरस

कुमुदिनी आणि मी

लेखक सरिता बांदेकर यांनी मंगळवार, 15/02/2022 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
कुमुदिनी आणि मी कॅालेजचा पहिला दिवस मी कधीच विसरू शकत नाही.त्यादिवशी मला कुमुदिनीचे प्रथम दर्शन झाले. आपलं पण रॅगिंग होईल म्हणून हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून इकडे तिकडे बघत पण कुणाला घाबरत नाही असा आव आणत तिने कॅालेजमध्ये प्रवेश केला होता. पण कॅालेजमधील टवाळ कार्टी तिचं ते सौंदर्य बघून घायाळ झाली आणि तिचं रॅगिंग करायचं विसरून गेली. त्यात माझ्या सारख्या भित्र्या भागूबाईचा मात्र फायदा झाला.मग मी ठरवलं काहीही झालं तरी कुमुदिनीशी मैत्री करायची. पण तिचं माझ्याकडे लक्ष जाईल असे कुठचेच गुण माझ्याकडे नव्हते.फक

लळा.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 15/02/2022 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे पाच वाजून गेले तरी ऊन चांगलच जाणवत होतं. मे महिन्यात संध्याकाळचे सात वाजेपर्यंत तरी अंधार होत नाही. आमचं खोपटीत लाकडं भरण्याचं काम सुरु होत. बाबा लाकडं रचून ठेवत होते, मी आणून देत होतो. बघता बघता अंधारून आलं. पाऊस पडण्याची चिन्हं दिसू लागली, आई वाळत टाकलेले कपडे काढायला धावली, आम्ही भरभर लाकडं खोपटीत टाकू लागलो. सगळ्यांची धांदल उडाली. लहान मुलं अंगणात उड्या मारत येरे येरे पावसा गाणं म्हणू लागली. आणि बघता बघता जोराचं वादळ सुरु झालं. सगळी लहान मुलं आंब्याखाली धावली. त्यांना सांभाळणाऱ्या आज्यांची धांदल उडाली.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 15/02/2022 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती , पेपरमध्ये वाचले "आम्हा घरी धन,* *शब्दांचीच रत्ने..." _ जगतगुरू तुकाराम मी सुटलो... बुंगाट आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, जुळवू प्रयत्ने, यमके ही. काय हे जाहले, कोसळला बाजार, कोणता आजार म्हणावा हा? जगाचा पोलीस पाटील, तू ते तर मी हे करेन भेदरला बिचारा युक्रेन युद्ध ज्वर लोक हैराण त्यात, निवडणूक धुरळा, जणू अंगावर झुरळा, झटकती वाहक ही गांजले इथे ट्रॅफिक जाम अमृतांजन बाम, चोपडती शिक्षणाचा खेळ खंडोबा तास ऑनलाईन इयत्तेला सलाईन बोंबलाई यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!
काव्यरस

१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 15/02/2022 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन.... "सव्वापाच करोड"!!! क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो..... आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट. मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार...

मला भेटलेले रुग्ण - २३

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 14/02/2022 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे.