Skip to main content

माझ्याही घरात.......

लेखक utkarsh shah यांनी शुक्रवार, 08/10/2010 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती .

उत्सव रानफुलांचा

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 08/10/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
जास्वंद गेंद Eriocaulon Sedgewickii पिवळी अबई_Reinwardtia indica शंकासूर शंकासूर

घाटवाटा

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 08/10/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांची आणि आपली मैत्री एकदा जुळली की मग हळूहळू घाटवाटांची ओळख व्हायला लागते. पहिल्यांदा आपली त्यांची गाठ पडते ती एका गडावरून दुसर्‍या गडावर जाताना. लांबची,फिरून जाणारी वाट टाळण्यासाठी आपण एखाद्या गावकर्‍याला रस्ता विचारतो आणि तो म्हणतो,त्यो किल्ला व्हय ? हे हित पलीकडल्या अंगाला,ह्यो दांड/घाट उतरला की खायल्या अंगाला !

खेळस्पर्धा प्रकार आणि सैन्याचा सहभाग

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 08/10/2010 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चालू असलेल्या राष्ट्रकुलस्पर्धांत भारत पदकांची लयलूट करत आहे. फारच समाधानाची बाब आहे. भारताने वैयक्तिक तसेच सांघिक खेळात अनेक पदके जिंकली आहेत. नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती, घोडेस्वारी आदी सांघिक तसेच वैयक्तिक खेळांना कुठल्याही देशाच्या सैन्यात महत्व असते. सैन्यात शक्यतो सांघिक खेळात महत्व असते. (क्रिकेट हा खेळ सैन्यात खेळला जात नाही.) सैन्यात वरचेवर बंदूकांनी नेमबाजीचा सराव केला जातो. या सरावाने चांगले नेमबाज तयार होवून शत्रूचे सैनीक मारणे हा हेतू असतो. किंबहूना नेमबाज असणे हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. सध्याच्या स्पर्धा पाहून खालील प्रश्न उपस्थीत होतात: १.

लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 08/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
तोच तोच काथ्या पुन्हा पुन्हा कुटून, फुटक्या कौलांवर पुन्हा पुन्हा दगड मारून कंटाळा आला असेल आणि वीकेंडला थोडा रुचिपालट हवा असेल तर हा घ्या... Sybille Hein सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.