लेखकसुधीर काळेयांनी बुधवार, 25/08/2010 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा'वरील सहसभासदांनो,
आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा.
त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच.
http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_cho…
धन्यवाद,
सचिनचा 'आद्य चमचा',
सुधीर काळे
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी बुधवार, 25/08/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
बहुचर्चित अयोध्येतील रामजन्मभूमी स्थानाबाबत पुढच्या महीन्यात सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.
अयोध्येतील ह्या पवित्र जागेवर राममंदीरच उभे राहावे अशी करोडो नागरिकांची इच्छा आहे. व त्यासाठी लढा हि दिला आहे..न्यायालय जनमताचा आदर राखेल ही अपेक्षा!
जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!!
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी बुधवार, 25/08/2010 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.
तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.