नारळी भात
नारळी भात
साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर,
मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड, लवंग, केशर, खाण्याचा रंग,लिंबु, साजुक तुप,चिमुटभर मीठ
पाकक्रुती:
प्रथम थोड्या तुपावर लवंगा टाकुन त्यावर तांदुळ भाजुन घेणे. त्यानंतर त्यावर आधणाचे पाणी टाकुन भात मऊ मोकळा शिजवुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ टाकावे. १ चमचा तुप घालावे.भात शिजला की परातीत काढुन घ्यावा.
नंतर १ वाटी पाणी घेउन त्यात पाउण वाटी साखर घालुन पक्का पाक करावा. नंतर त्यात नारळाचा चव घालावा. त्यात लिंबु पिळावे व १ चिमुटभर रंग घालावा. त्यानंतर शिजवलेला भात घालावा.
मिसळपाव
