तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती ?
लोकसभेच्या निवडणुकीत "आम आदमी के साथ, कॉंग्रेस का हाथ', अशा घोषणा देणार्या कॉग्रेसला आता महागाई वाढल्याचे कळाले असावे कारण आता खासदारांची पगारवाढ करण्यात आली आहे. फारच गरीबीचे आणि कष्टाचे जीवन हे खासदार मंडळी जगत असावेत. यातील बहुतेक खासदारांची संपत्ती काही कोटीच्याही पुढची आहे, तरी सुद्धा या लोकांना पगार कमी पडतो तर आम आदमीची काय अवस्था असेल ? अर्थात आम आदमीला विचारतोय कोण ज्याला त्याला स्वतःची पडलेली आहे, खासदारांना वाढीव पगार मिळण्यासाठी सर्व पक्ष कसे एकत्र आले याचे सुरेख आणि दुर्मिळ चित्र पहायला मिळाले,मग त्यात डावे असो वा उजवे पगार वाढ मिळतेय ना ?
मिसळपाव
राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU!