आप्पे
आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- ३ कप तांदुळ,१ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ, चवीनुसार मीठ.
कृती:-
तांदुळ आणि डाळ वेगवेगळे ५-६ तास भिजत घालावेत.नंतर पाणी काढुन टाकुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.{ तयार झालेले पीठ ५-६ तासचे झाकुन ठेवले तर आप्पे जस्त हलके होतात. लगेच करयचे असले तरि हरकत नाहि.} तयार झालेले पिठ एका पातेल्यात काढुन घेऊन त्यात खवलेला नारळ आणि चविनुसार मीठ घालुन एकजिव होई पर्यंत ढवळावे.
मिसळपाव
गगनावरी तिरंगा ....!!
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!
तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!
साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!
तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस