Skip to main content

असच काहीसं

लेखक नेहमी आनंदी यांनी शनिवार, 03/07/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निर्ढावलेला श्वास अंतरंगात कोंडतो आहे उसळलेला अश्रू सांडण्या साठी तळमळतो आहे शकले माझ्या मनाची झाली..... होतील अजुन ही........ भाव मनीचा सामोरी पोचण्या अडखळतो आहे कसे रोखू या आत्म्याच्या तडफडीला जाता जाता श्वास का घुसमटतो आहे चाहुल कुणाची लागली........ का लागली........ परतीची वाट आता घरंगळती आहे... कानात गुज तुझी माझ्या झंकारु दे ओठातले स्मित माझ्या तुझ्या नयनात दिसु दे साद घातली मी त्या परतीच्या वाटेला धावत ही आली ती माझ्या धरुन हाताला घुसमट, तडफड सोडुन श्वास ही मोकळा झाला अनिवार भावना तरी ही अडखळली ग तुझ्या पर्यन्त पोचण्याला.... प्रसन्ना जीके
काव्यरस

प्रलय

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 03/07/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय......... " येते “ म्हणून सांगून गेली, परतुनी ना आली पुन्हा. वाट पाहुनी जीव शिणला, दाटल्या अन्तरी यातना. परतीच्या वाटेवर तुझ्या, सजविला आसवांचा ताटवा . जाहले निर्माल्य त्याचे, येशील तू केधवा ? अनमोल निर्माल्य हे गंगेत कुठल्या वाहवू ? महापुराचा प्रलय नंतर, एकला कसा मी थोपवू ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

हिरो टू झिरो...

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 03/07/2010 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राझिल वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे तसेही या मॅच मधे फारसे लक्ष नव्हतेच... तसेही मॅच घाना आणि उरुग्वे यांचा मध्ये होती... घाना आफ्रिकेतला उरलेला शेवटचा स्पर्धक देश... मॅचचे पहिले ९० मिनिट आणि एक्स्ट्रॉ टाईम चे २९ मिनिट चांगले झालेच.. दोन्ही संघ आक्रमक होतेच आणि शेवटच्या काही मिनिटांत तर घाना सतत उरूग्वेच्या हाफमध्येच होता. पण खरा थरार घडला तो सामना संपायला काही सेकंद बाकी असताना... घानाला एक फ्री कीक देण्यात आली. स्टीव्हन अ‍ॅपीया ने केलेला प्रयत्न उरूग्वेच्या सोरेझने अडवला , पण तो हाताने. आणि अगदी मॅचच्या शेवटच्या सेकंदाला घानाला एक पेनल्टी कीक आणि सोरेझला रेड कार्ड मिळाले.
विशेष

संताचा केक

लेखक दिपाली पाटिल यांनी शनिवार, 03/07/2010 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, खालील पाककृती आहे एन्जेल (मराठी शब्द- संत??) चा केक, आणि अजून एक असतो तो सैतानाचा केक (डेव्हील्स फूड केक..).. मी जेव्हा हे दोन्ही केक पाहीले तेव्हा मला वाटलं एन्जेल फूड केक पांढरा असतो म्हणून त्याला एन्जेल चा केक म्हणतात आणि डेव्हील्स फूड केक काळा (चॉकलेटचा) असतो म्हणून त्याला सैतानाचा केक म्हणतात पण खरं कारण असं आहे की एन्जेल फूड केक मध्ये कॅलरिज फार कमी असतात म्हणजे बटर/लोणी नसतं,तो फक्त अंड्याच्या पांढर्‍या बलकापासून बनतो आणि रंगालाही पांढरा असतो.

उगाच काहितरी

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 02/07/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुखवट्याचा देखावा करून मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्या तसेच काहीसे झाले आहे फुर्रर्र्र फुर्र्रर्र्र्र फुर्र्र्रर्र्र्र सुंसुंसुंसुंसुंसुंसुंसुं नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे असेच काहीसे झाले आहे कुंडीत टोम्याटोचे झाड लाऊन टरबूज यावा अशी अपेक्षा करावी का पण असेच काहीसे झाले आहे हृदयात धडधड होऊन प्रेमाच्या ऐवजी हार्ट आट्याक यावा असेच काहीसे झाले आहे प्रेमाचा वॉलपेपर लावून आपले हित साधावे असेच काहीसे झाले आहे सुरुवातच कडू कडू केल्यावर शेवट तरी कसा गोड गोड होणार तसे करायची इच्छा मात्र होत आहे अशीच कडवाहट ठेवली तर आम्ही नाही ज्ज्ज्जा !!! ----------------------------
काव्यरस

एक समिक्षा ( बी ए भाग दोन)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/07/2010 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या एक आदरणीय सदस्या मृगनयनी देवीनी एक थोर काव्य खेचर टंकणीने स्क्रीनवर उतरवले.. त्या खेचरीच्या काव्यखेचराची विद्यापीठातील अभ्यासक्रमात वर्णी लागली आणि बी ए भाग दोन च्या पेपरात कवितेचे समिक्षण लिहिण्याच्या प्रश्नावर का विद्यार्थ्याने लिहिलेली ही समिक्षा मूळ काव्य खेचरः ____/\____ फार झाला हा कवितेचा पसारा.... आता आवरा आवरा..... आम्ब्याच्या वनात नाच रे मोरा... घाल घाल पिन्गा वारा.... सन्गे पावसाच्या धारा.... आय डोन्ट लव ब्रायन लारा...... यातला कोण बरे पुरुष?= वीर की झारा... जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारा...... शरारा... शरारा....... तुझा मिर्चीचा तोरा..... रन्ग कधी काळा..

रुपया

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/07/2010 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
रुपया पूर्ण पणे परिवर्तनीय.....rupee fully convertible... असावा अशी चर्चा व मागणी फार पूर्वी एकली होती..प्रश्न खूप टेकनिकल असल्याने .. कुणी जाणकार समजावून सांगू शकेल काय.. १...म्हणजे नेमके काय... २..फायदे ...तोटे ३..सरकारची भूमिका, ४..आज रुपया परिवर्तनीय. आहे का