Skip to main content

मायभूमीची नवी मराठी वेबसाईट

लेखक मड्डम यांनी गुरुवार, 03/06/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
मायभूमी.कॉम महाराष्‍ट्राच्‍या कडेकपा-या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणा-या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे.

मनश्री

लेखक जयवी यांनी गुरुवार, 03/06/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो. तिच्या जन्मापासून तर तिच्या “बालश्री” हा पुरस्कार मिळण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासात लेखकाने तिची आई, वडील, तिची बहिण, खुद्द मनश्री ह्यांच्या शब्दातून तिची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचं जिवंत शब्दचित्र चितारलंय. हे वाचताना पदोपदी डोळे भरुन येतात…..

विज्ञानवाद्यांना खुल्लमखुल्ला आव्हान!! बोला करताय?

लेखक गुंडोपंत यांनी गुरुवार, 03/06/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या एका चर्चेत गुरफटलो होतो. तेथे मला एका सदस्यानी शोध निबंध वाचायला अनेक सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यातले कुठलेही मान्यता प्राप्त जर्नल वाचून पाहा. संशोधन, प्रयोग वगैरे कसे करतात याची चिक्कार माहिती मिळेल. असा सल्ला दिला. पण मला असे जर्नल्स मराठीमध्ये कुठेही मिळाले नाहीत. मी डोळे फुटेस्तोवर शोधले, काहीही मिळाले नाही. जे आहे ते सगळे काही इंग्रजी भाषेत आहे. मराठीत काहीच मिळाले नाही. हे तर फार म्हंजे फार लांबची गोष्ट झाली! मला साधे लहानमुलांना विज्ञानातील साध्या साध्या कल्पना समजावून सांगणारे मराठी स्थळही मला दिसले नाही.

आपला प्रवास ........पर्यावरणाचा र्‍हास

लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 03/06/2010 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची रिमझिम सुरू होताचे शहरवासियांना वेध लागते ते वर्षा सहलीचे. पावसाचे आणि निसर्गाचे नाते तसे अतुटच. पावसाळ्यात काय करायचे? याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. बाहेर पाऊस पडत असताना कुणाला घरी जुनी गाणी ऐकत मस्त कांदाभजी फक्कड चहाबरोबर खायला आवडतो, तर कुणाला मित्र मैत्रींणीसोबत धबधब्यात, धबधब्यातल्या पाण्यात स्वच्छंदी धमाल करायला आवडते, तर काहींना सह्याद्रिच्या कुशीत फिरायला.

ऑफिसातले गाणे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/06/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसातले गाणे जय महाराष्ट्र मंडळी! आपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता आपण या 'ऑफिसात गाणे ऐकणे' या विषयावर जी चर्चा त्या अनूषंगाने जाणारे काही प्रश्न असे: १) गाणे सेंट्रलाईज आहे का?

गीत: कसं जगावं या असल्या दिवसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/06/2010 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: कसं जगावं या असल्या दिवसात
देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ|| जिथं बघावं तिथं चालते लाच अन लुटमार नव्याणवाचा आकडा येई शेवटी वस्तूच्या किंमतीवर फसवणूक करूनी धंदा करता, गिर्‍हाइकांचं कोन ऐकेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||१|| झाली भाजी महाग, गेली कुठं किफायत? प्रवास नाही स्वस्त, रिक्षावाले लुटतात मस्त अन्नधान्यात भेसळ होवोनी, वरणासाठी डाळं मिळेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||२|| कामावर राबराबूनी, येई घरी परतूनी टिव्ही ची कटकट असत
काव्यरस

आचार्य विनोबा भावे एक ऋषि

लेखक भय्या यांनी गुरुवार, 03/06/2010 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
घरगुती सावरकर या धाग्यावर महत्वाची माहिती मिळत गेली.(जरी आणि विषयांतर खुप झाले तरी)एका महत्वाच्या व्यक्ती बद्दल काही तरी लिहावे असे वाटून गेले.म्हणून हा प्रपंच. महात्मा गांधी यांचे दोन वारसदार. पैकी राजकिय वारसा पं. नेहरूंकडे गेला आणि अध्यात्मिक वारसा विनोबा भावे यांचेकडे आला. आचार्य विनोबा भावे १)ग्लोबलायझेशन बद्द्ल फार पूर्वी त्यांनी विचार मांडले होते. सर्व पत्रांच्या शेवटी ते जय जगत असे लिहीत असत. २)गीताई सारखा उत्तम ग्रंथ त्यांनी लिहीला. हा ग्रंथ हा एक भाषअंतराचा उत्तम नमुना आहे.

दाता इतना दिजे....

लेखक रामदास यांनी गुरुवार, 03/06/2010 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनमोल रत्नांना स्वतःचा असा खास इतिहास असतो. मार्क अँटनीचा आताच कुठेतरी उल्लेख झालासा वाटला आणि एक संदर्भ आठवला एका ओपल रत्नाचा. नॉनीयस नावाच्या एका सिनेटर कडे हे ओपल होते. ओपल म्हणजे हिरा नव्हे.ओपलची गणना उपरत्नामध्ये होते.फारसे दुर्मीळ नसणारे रत्न आहे. पण रत्नाची किंमत ठरते आपल्याला हवे असणे आणि आपल्याकडे नसणे यावर . मार्क अँटनीने नॉनीयस कडे ते रत्न मागीतले .नॉनीयसने नकार दिला.

नाईलच्या देशात - ४ : स्फिंक्स

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/06/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला. आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो.