नल सरोवर
दिनान्क ७ फेब्रुवारी २०१० - रविवार. सकाळी ६:१५ वाजता आम्ही घरून निघालो - नल सरोवर ला जाण्यासाठी. नल सरोवर पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ६० किलोमीटर दूर असलेले एक सरोवर. क्षेत्रफळ ११६ चौ. कि. या सरोवराच्या मध्ये छोटी छोटी बेटे आहेत . त्या बेटान्वर आणि सरोवराच्या पाण्यामध्ये पक्षी निरीक्षण करायचे. गुजरातमधले हे सगळ्यात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य. दर हिवाळ्यात येथे खूप वेगवेगळे परदेशी पक्षी स्थलान्तर करून येतात.
आम्हालाही काही दुर्मिळ पक्षी बघायला मिळतील अशी आशा मनात धरून आम्ही निघालो. साधरण तासा सव्वा तासाचे अन्तर. सकाळचा प्रसन्न करणारा गारवा वातावरणात होता.
मिसळपाव