आणखी किती सतिश शेट्टी?
आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता.
परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.
मिसळपाव
९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.