Skip to main content

शब्दांची कर्णफुले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

पंचतत्व

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतत्व अनंत आकाश पाहता मन माझे मोठे झाले तेच आकाश मनात कोंबले क्षणात सुक्ष्म अ‍ती लघू झाले ||१|| विस्तीर्ण जलाशय तो सागर त्यापुढती मी यकश्चित केवळ नाव घडवली फळकुट घेवून लिलया पार कराया मिळे बळ ||२|| डोंगरांचे पर्वत जाहले लंघून जाण्या उर धपापले विमानात मात्र बसता गिरिशिखर भव्य भासले ||३|| संकटांची धग आली पेटून शत्रूसमान खिंडीत गाठून वारामागून वार करून पराजीत केले त्यांना जिंकून ||४|| मार्ग समोरील नवीन अवघड चरण थकले चालून चालून उत्साहाचा झरा न थकला ध्येय समोर आले चालून ||५|| - पाभे २४/०९/२०२१

पक्कीची पहिलीवहिली गोष्ट

लेखक भागो यांनी गुरुवार, 23/09/2021 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे पक्कीची. आधी तुम्हाला पक्की कोण त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही पण पक्कीला वेडा ठरवून त्याच्या गोष्टी वाचणार नाहीत. पक्कीची पक्की ओळख झाली की मग तुम्ही त्याचे फॅन व्हाल! पक्की ऊर्फ पक्या ऊर्फ प्रकाश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वय किती? तो कितीवीत शिकत आहे? कुठल्या शाळेंत जातो? मला नका विचारू कारण त्याची उत्तरे मला माहीत नाहीत. कधी कधी तो इतका प्रगल्भ वागतो की त्याचे वय साठ+ असावे असे वाटावे. कधी कधी त्याच्या निरागस वागण्याने तुम्हाला वाटेल की तो पाच सहा वर्षांचा असावा. तुम्हीच ठरवा.

संभाव्याच्या अब्ज छटांतून

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 23/09/2021 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
संभाव्याच्या अब्ज छटांतून वर्तमान उजळतो कशाने? कोण ठरविते? किंवा सारे, यदृच्छयाच घडून जाते? भूतभविष्यातील भासांचे इंद्रजाल मायावी छेदून काल-प्रवाहा स्तब्ध करोनी ऐलपैल वर्तमान उरते कालौघाची गाज अनाहत चराचराला व्यापुनी उरते "क्षण आत्ताचा क्षणजीवी नच" क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
काव्यरस

आजोळच्या आठवणी ​

लेखक नानुअण्णा यांनी गुरुवार, 23/09/2021 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षापुर्वीची गोष्ट, आम्ही तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात एका गावात रहात होतो. माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. आमचं आजोळ चौल आणि आईच माहेर अलिबागच्या कुशीतील वरसोली. वर्षांतून एकदा मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत आम्ही सगळे आजोळी जात असु, आगगाडी, लाल एष्टी असा आमचा आठ एक तासाचा प्रवास असे किंवा व्हाया मुंबई असा. मुबंईत, किंवा डोंबिवलीत एक थांबा आत्या, काकांकडे आणि मग कधी भाऊच्या धक्क्या वरून लाँच अथवा लाल एष्टी. त्यावेळी एष्टी वाटेतील सगळ्या गावात थांबे. एस्टी खचा खच प्रवाशांनी भरलेली असे. सामान, टोपल्या, माश्यांचा वास. कंडक्टर आणि प्रवाशांचा कलकलाट.

मर्कट वंश

लेखक मका म्हणे यांनी बुधवार, 22/09/2021 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे, माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी, खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे? विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी, शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे तेच थोड़े ओठी येण्या, करो वाटे मग खट्याळ चाळा खोल गेल्या वात्रटाला साद घालता मजा आहे भली भली माणसे असती आतून व्रात्य मुलांपरी या मुलांच्या हातावरी टाळी देण्याची खाज आहे मी नव्हे हो त्यातला अन मी नाही त्यातली हेच जन त्वरे उठती कड़ी लावण्या आतली विसंगति त्यांच्या मनीची त्यांच्या पुढ

मुखवटे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2021 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१|| मनात कटूता असूनी वाहवा करती हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२|| तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३|| स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४|| खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे? मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५|| - पाषाणभेद २१/०९/२०२१
काव्यरस

लागली कशी ही उ - च - की

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/09/2021 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधी लेखाच्या शीर्षकाचा उलगडा करतो. “मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहित नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे……. ..... ..... आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी उचकी लागते. ती अचानक येते व थांबतेही. अशा अचानक १-२ उचक्या लागल्या की, “कोण माझी आठवण काढतंय आज” असा पारंपरिक सुखद काल्पनिक विचार मनात चमकून जातो खरा.

अळीवाचे लाडू

लेखक मनस्विता यांनी रविवार, 19/09/2021 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे  यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे. त्यात ती गाडीत जागा पकडण्यासाठी माझ्या मावसभावाला एसटीच्या मागच्या खिडकीतून चढायला लावायची. तर ह्या सगळ्या गडबडीत तिला आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून आणायच्या असायच्या.

कूरबूर / (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

लेखक सतीश रावले यांनी रविवार, 19/09/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
2 .. (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर - कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती - Mental State of being gracious to act! ..................................................................... [लेखाचं उद्दीश्ट: अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्‍या ऊर्जेची तर्‍हा टप्पे : अनूवे