Skip to main content

मैत्र: जून, जुलै आणि पावसाचे...

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 03/06/2009 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिना म्हणाला पावसाला... मी आलो, पण तू का नाही आलास? की येवू देतोस जुलै ला? तीच्यासोबत तूला मनसोक्त स्वतःत भटकायला.. आणि तीला मनसोक्त स्वतःत भिजवायला... की जुलै या मैत्रिणीसाठी... विसरलास जून या (जुन्या) मित्राला? पूर्वी मला भेटलास की मगच.. तीला भेटायचास... आता तीच्यासाठी मग.. मला विसरलास? ती आली की मी जातो... बघूया आता तू कुणाला आधी भेटतोस? अन कुणाला भेटीसाठी ताटकळत ठेवतोस? पुढच्या वर्षापर्यंत! --- निमिष सोनार, पुणे
Taxonomy upgrade extras

प्रणयाचा प्याला...!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 03/06/2009 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या पेटलेल्या पाण्यात... वार्‍याच्या वेगवान वाटेवर... बेटावरल्या बहरलेल्या बागेत... आकाशाच्या अमर्याद आभासात... सागराच्या संथ सुरावटीत... सूर्यकिरणांतील सुप्त सप्तरंगांच्या साक्षीने... इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा... "प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला..!!" "प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला...!!!" --- निमिष सोनार, पुणे
Taxonomy upgrade extras

<strong>आता रायगडावर रहावत नाही.....</strong>

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 03/06/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
आता रायगडावर रहावत नाही..... आजच्या या इंग्रजाळलेल्या वातावरणात वाढलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो , स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा तुम्हा सर्वांना नमस्कार ! तुमच्या हल्लीच्या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे , आज ६ जून २००९. म्हणजे आज आमचा राज्याभिषेक ३३६ वर्षांचा झाला - म्हणजेच आज ३३५ वा वर्धापन दिन !पर्यायाने तुमच्या हे ही लक्षात आलं असेलच की , आज ३३५ व्या वर्धापन दिनानिमित्त , आणि आमच्या निर्वाण दिनानंतर ३२९ वर्षांनी पण आमचा आत्मा तुमच्याशी संपर्क साधतोय म्हणजे ही सारी वर्षे आम्ही होरपळतोय !

शंखतीर्थ!!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 03/06/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण येता, निळा डोह फ़ेसाळतो पापण्याच्या तीरावर, भरतीचा पूर येतो.. क्षण निसटले जणू, मूठीतून जावी रेती शिंपलीत नयनांच्या, भिजूनिया गेला मोती गाज हृदयाची खोल, स्पंदनात तुझी सय विरहाच्या लाटा उंच, वादळाचे मला भय तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त अस्ताचलास रे गेला, माझ्या आकांक्षेचा रवी धूसरला चंद्र माझा, काळोखास बोल लावी दूर दूर क्षितिजाला, भेटण्याची आस व्यर्थ आठवांस अर्पिते मी, आसवांचे शंख तीर्थ - प्राजु
Taxonomy upgrade extras

खेळ जुने-नवे

लेखक जागु यांनी बुधवार, 03/06/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे खेळ म्हणजे पकडा-पकडी, लपाछूपी, डबाइसपैस, विठी दाडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, म्हातारी म्हातारी, पायता पायता, आट्यापट्या, रुमाल उडवी, पतंग उडविणे, चाक फिरविणे (गाडा) आबादबी, खांबापकडी, आणि असे बरेचसे खेळ होते. ह्या खेळांमधून मुलांचे मनोरंजन तर होतच होते शिवाय त्यांचा व्यायामही होत होता. तसेच काही खेळ होते जसे कवड्या उडविणे, अटक्-मटक, भोवरा फिरवीणे, चिठ्ठी चिठ्ठी, भातुकली ह्या खेळातुन मुलांचे निखळ, निरागस मनोरंजन होत होते.

"माय"

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधीमधी उगाचच वाटत राहतं, आपणही आभाळ व्हायला हवं होतं.. मायच्या फाटक्या नशीबावर, फाटकं का होईना.. पांघरुण व्हायला हवं होतं. पापणी होऊन अलगद, तिच्या आसवांना झेलायला हवं होतं.. तिच्या आयुष्यातल्या अंधारावर, चांदणी होवुन का होईना .. भरपुर पाझरायला हवं होतं. तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर, जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं.. राहुन राहुन मन खंतावतंय, एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन.. मनसोक्त रडायला हवं होतं. विशाल.

माझं काय चुकलं...?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतं अजुनही .... आपलं ते... कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं. तुझं पुन्हा पुन्हा, मान वळवून बघणं... आणि उधारीवर घेतलेल्या... सिगारेटच्या धुरात, माझं डोळ्यातलं पाणी दडवणं. तु विचारलं होतस का रे?

"आनंदी आनंद गडे!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 03/06/2009 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत. "आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच" असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला, "हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे." हे ऐकून मी म्हणालो, "बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं म