Skip to main content

तुझी माझी प्रित

लेखक जागु यांनी शुक्रवार, 22/05/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित राधा कृष्णाची रास व्हावी वेणू च्या नादी तुझ्या माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी. तुझी माझी प्रित राम सितेचा आदर्श व्हावी वनवासातील पर्णकूटीलाही तृप्ततेची झालर झळकावी. तुझी माझी प्रित गौरी-शंकरासम पुण्य व्हावी हिमालयाच्या शिखरावरही तुझी माझी प्रित नांदावी. तुझी माझी प्रित विठोबा-रखूमाई भोळी वसून स्वतंत्र मंदीरी जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.
Taxonomy upgrade extras

जमा खर्च

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/05/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या समाधीवरची फुले समाधीवर उधळलेला गुलाल... सोबत, रंग उडालेले; फिकुटलेले कुंकू, तिच्या कपाळावरले..... तिने ढाळलेली असंख्य कढत कढत आंसवे! त्यावर तिच्या वाट्याला,... सहानुभूतीचे फक्त कोरडे शब्द; त्याच्या हौतात्म्याची किंमत म्हणून.... !! ह्या बलिदानाचा जमाखर्च कधी लागणार? सुकल्या आंसवांशिवाय तिच्या ओच्यात काहीच नाही का पडणार?........ विशाल

हल्ला बोल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 22/05/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
ढेकणाधिपतींनी घसा खाकरला आणि सभा सुरु केली. ________________________________________________________ मिपाच्या २ र्‍या वर्धापन दिनानिमित्त तात्या अभ्यंकरांनी 'मिपा विश्वसंमेलन 'भरवायचे ठरवले. दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. निवासित अनिवासित सर्व सद्स्य संमेलनाला येणार होते. तात्यांनी कौल घेतला. विश्वसंमेलन पुण्याला करायचे ठरवले. सामिष, आमिष व शाकाहारी मेन्यु ठरला. हॉटेल बुकींग क्लार्क शी संभाषण करताना खुर्चीतल्या ढेकणाला ही बातमी कळाली. मंदीमुळे गेले २ वर्षे ह्या हॉटेल मधे 'पेस्ट कंट्रोल' झाले नव्हेते. तात्याना बघताच ढेकुण खुष झाला. येत्या मेजवानीची खबर त्याने सर्व ढेकुण समाजाला पोचवली.

(Bore-kuting हा माझा छंद आहे)

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 22/05/2009 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चारोळ्या पाडणे हा माझा छंद आहे बरेच दिवस झाले मला प्रतिसाद येणं बंद आहे तरीही मी चारोळ्या पाडतच असतो सर्वाना ती वाचण्याची बळजबरी करत असतो पण त्या कंपुबाजांना साधा प्रतिसादही देता येत नाही लिहिणार्‍यालाही प्रोत्साहन मिळावं असं कधीच वाटत नाही म्हणून काय झाले मी खच पाडतच जाणार आहे कारण चारोळ्या पाडणे हा माझा छ॑द आहे ;) कृ. ह. घ्या. मराठमोळं मन
Taxonomy upgrade extras

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 22/05/2009 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
"ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो.पण हे आव्हान जरा जबरी होतं. मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्यापलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय?

अभिनंदन : कृष्णा पाटील

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 22/05/2009 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई -- वय वर्षे १९ फक्त ! एक इतिहास रचला गेलाय !! हार्दिक अभिनंदन !!! --------------------- या निमित्ताने मुलींच्या गिर्यारोहणाला अजून चालना मिळावी या शुभेच्छा. आमचा एक मित्र म्हणतो प्रत्येकाने एकदा तरी गिर्यारोहण करून पहावे -- जगण्यातली एरवी मोठी वाटणारी संकटं म्हणजे साध्या कटकटी वाटायला लागतात ! कृष्णा पाटील यांचे त्रिवार अभिनंदन. कुणी मिपाकर त्यांच्या परिचयाचे असतील तर जरूर शुभेच्छ कळवाव्यात.

वेरूळा की विरूळा सापाचे इंग्रजी/शास्त्रीय नाव?

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 22/05/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळमधे वेरूळा सापाच्या ६६ पिल्लांना जंगलात सोडले अशी बातमी वाचली. ह्या सापाचे शास्त्रीय वा इंग्रजी नाव काय? विविध सापांची भारतीय भाषांतली नावे आणि इंग्रजी/जीवशास्त्रीय नावे मिळू शकतील अशी कुठली साईट कुणाला माहित आहे क?

orkuting हा माझा छ॑द आहे

लेखक स्वप्निल मन यांनी शुक्रवार, 22/05/2009 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
orkuting हा माझा छ॑द आहे बरेच दिवस झाले मला scraps येण॑ ब॑द आहे तरीही मी सर्वा॑ना scraps करतच असतो scraps वाचण्याचा आन॑द मिळू देत असतो पण त्या॑ना साधा reply ही देता येत नाही पाठवणार्‍यालाही आन॑द मिळावा अस॑ कधीच वाटत नाही म्हणून काय झाले मी scraps पाठवतच जाणार आहे कारण orkuting हा माझा छ॑द आहे
Taxonomy upgrade extras

काही लोकांना कम्युनिझम आणि कम्युनिस्ट विचारसरणी का आवडते?

लेखक विकास यांनी गुरुवार, 21/05/2009 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
या काथ्याकुटाची स्फुर्ती: लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का? कम्युनिस्टांबद्दल (विशेष करून भारतीय) मला का राग आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या चर्चांतील प्रतिसादात येत असल्याने तसेच माझ्या भावना इतर अनेक विचारी सदस्यांनी मांडल्या असल्याने मी त्या तेथे परत मांडल्या नाहीत... मात्र तेथे कॉम्रेड्स अथवा समर्थक कम्युनिझमका हवा हे सांगायच्या ऐवजी इतर कसे वाईट हेच लिहीत बसले (त्यात खोटे किती हा एक मुद्दा आहेच). कदाचीत चर्चाविषयाच्या प्रश्नामुळे तसे घडले असेल. म्हणून हा वेगळा चर्चा प्रस्ताव.