Skip to main content

सामना चालकांच्या डोळ्यांत अंजन

लेखक घोडीवाले वैद्य यांनी गुरुवार, 21/05/2009 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत मनसेने शिवसेनेला भुईसपाट केल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला. त्यात सामना चालकही (?) मागे नव्हते. राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी या महाशयांनी इ-सकाळचा आधार घेतला. त्यावरील केवळ राज यांच्याविरोधातील प्रतिक्रिया सामनात छापल्या. मात्र उद्धव यांना त्यांची ला..की दाखविणारी एकही प्रतिक्रिया त्यात नव्हती. आता इ-सकाळवरच मराठी मतविभाजनासंबंधी एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील प्रतिक्रियांची दखल सामना घेणार आहे का? http://beta.esakal.com/2009/05/19163101/features-current-affairs-about…

जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/05/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील?

कांद्याच्या पातीचा भात

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 21/05/2009 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एकदा आंतरजालावर भटकत असताना स्प्रिंग ओनियन राईस अश्या नावाची पाककृती दिसली. उत्सुकता म्हणून ती कृती वाचली आणि करुनही बघावीशी वाटली.

क्षितिज

लेखक स्वप्नयोगी यांनी गुरुवार, 21/05/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यात अन् माझ्यात फक्त एका क्षितिजाचं अंतर आहे, 'जवळ असून दूर अन् दूर असूनही जवळ आहे.'

खेड्यातला आणि शहरी मुलगा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/05/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
खेड्यातला आणि शहरी मुलगा असशील बघत टिव्ही जरी तू विटीदांडू कधी खेळलास काय? खेळलास काय? नाय रे नाय, नाय रे नाय खॉत असशील ऑईस्क्रीम तू बांधॉवरची बोरं तू खॉल्लीस कॉय?
Taxonomy upgrade extras

असा फिरे

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 21/05/2009 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला जसा माझ्या रोमरोमी तुझा छंद दाटलेला मेघांच्या रुपेरी कडा एकाएकी काजळल्या तुझ्या मीलनाच्या आशा मनामध्ये उजळल्या खळाळून वाहे पुन्हा झरा जसा आटलेला इंद्रधनू झूल्यावर मन उंच झोके घेई कधी तुझ्या वाटेवर चातक होऊन जाई (जसा पाऊस होऊन तूच त्याला भेटलेला!) लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला
Taxonomy upgrade extras

नयनी तुझ्या

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 21/05/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांशिवाय भावना दिसतात नयनी तुझ्या शब्द दडले डोकावून हसतात नयनी तुझ्या गजरा माळून माझे भाव टिपशी आरशात ताटवेच्या ताटवे फुलतात नयनी तुझ्या वीज येवून मिळावी पावसात चिंब मिठी थेंबहि मग पाण्याचे भिजतात नयनी तुझ्या तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या तु समोरी येताच माझे शब्द देतो फेकूनी पाहूनच ऐकतो ते बोलतात नयनी तुझ्या निरोप कशाला घ्यायचा मनास वाटे जरी निरोपाचे हातहि मग झुरतात नयनी तुझ्या ऋषिकेश (१४-०५-२००९)
Taxonomy upgrade extras

हा माझा मिसल पाव वर चा प्रवेश

लेखक अभिशेक अधौ यांनी गुरुवार, 21/05/2009 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जरा विसावता त्या वळणावर कळले मला तुजे च तू पण.... थिजले अंतर विरले ते क्षण... आठवणींच्या त्या वळणावर... कसे कळले कोणास ठावूक तुला हे माज़े वेडेपण... नकळत घडून गेले सारे आयुष्याच्या एका वळणावर... कसे मी विसरु सांग तुला सोडून गेलीस जशी मला जगणे फक्त त्या भाबड्या आशेवर येशील का परतुनी या वळणावर...? ? अभिशेक

यावा अशात साजण

लेखक जयवी यांनी गुरुवार, 21/05/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुटे बेभान हा वारा फुले उरात शहारा यावा अशात साजण देत गुलाबी इशारा हृदयाच्या सागरात लाटा उठाव्या खट्‍याळ प्रीतीशरांनी सख्याच्या व्हावे पुरते घायाळ सारी बंधने तोडून उधळावा कैफ सारा वेड्‍या मनाने मनाचा द्यावा सोडून किनारा निळाईने पसरावे आकाशाच्या कुरणात गाणी गावी अवखळ द्वाड वा-याने कानात खळे पडावे चंद्राला यावे चांदणे वयात बहरावी रातराणी गंधाळावी सारी रात नभदीप तारकांचे हलकेच व्हावे मंद प्रीतीफुलांच्या श्वासांनी पांघरावा मधुगंध जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras