नयन मोहणारे नैनीताल - भाग ३
भाग १
भाग २
तिसऱ्या दिवशी मी उठलो, ते जरा उशीराच. तरी मुम्बईत उठतो त्या मानाने तर मी पहाटे उठलो, असंच म्हणायला हवं. आदल्या दिवशी स्लाईड शो जेव्हा दाखवला गेला, तेव्हा 'रोप कोर्स" ह्या प्रकाराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती देण्यात आली होती. त्याच्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे बघून जांभया देणारे आम्ही सूर्यवंशी खडबडून खूर्चीत सरळ होऊन बसलो. छायाचित्रांत बोल्डरिंग, रॅपलिंग, रिवर क्रॉसिंग (सस्पेन्शन ट्रॅव्हर्स), पॅरलल रोप, इ. ची प्रात्यक्षिके बघून आमची गाळण उडाली.
मिसळपाव