कंदहार.. (इराणी चित्रपट 2001)
कंदहार....
आत्ताच्या अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहून राहून राहून आठवतोय 2001 साली प्रदर्शित झालेला मोहसीन मखबलाफचा कंदहार हा चित्रपट. हा खरंतर 9/11च्या आधीचा आहे. तालिबान तेव्हाही तिथं होतंच.
नफस आपल्या कुटुंबासोबत लहानपणीच अफगाणिस्तान मधून कनडामध्ये पळून आलेली आहे. त्या सगळ्या पळापळीत तिची एक बहीण अफगाणिस्तानमध्येच राहिलीय. नफस सुरक्षित आयुष्य जगतेय खरी पण बहीणीच्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाविषयी तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. कधीतरी येणारं एखादं पत्र एवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क.
एक दिवस नफसला बहिणीचं पत्र येतं की ती येत्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्महत्या करतेय.
मिसळपाव