कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 1)
सुरवातीलाच सांगते मी पूरग्रस्त नाही, पुरामुळे माझं कोणतंही नुकसान झालेलं नाही.आधी अप्रत्यक्षपणे आणि पुरानंतर मी प्रत्यक्ष यात सहभागी होते आणि त्याचाच हा अनुभव.
तर माझं गाव चिपळूण. दर पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी भरणं ही अगदी वार्षिक कार्यक्रम असल्यासारखी गोष्ट. क्वचित थोडं कमी जास्त होत पाणी. पण त्यात विशेष वाटावं असं काही नाही इतकी त्याची सवय झालेली. आज मी 10 वर्षाच्या मुलाची आई आहे. मी जेव्हा पहिली दुसरी मध्ये होते तेव्हापासून मला आठवतंय त्याप्रमाणे पावसाळ्यात पाणी भरल्याची सुट्टी मिळायची किंवा अर्ध्यातुन शाळा सोडून द्यायचे.
मिसळपाव