Skip to main content

संगणन समस्या : तांत्रिक मदत हवी

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 10/02/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संगणन करताना एक समस्या आहे. उपाय माहिती नाही. मार्ग शोधतोय. माझ्या एका प्रोजेक्ट् मधे , एका जे एस् पी मधे काही डॉक्युमेंट्स् चे दुवे आहेत. ही सर्व डॉक्युमेन्ट्स् माझे ऍप्लिकेशन्स् "अटॅचमेंट्स्" म्हणून ऑरकल विदागारात साठवते. एकेका दुव्यावर क्लिक् केले असता , ते ते डॉक्युमेन्ट् उघडायचे का क्लायंटवर जतन करायचे याचा डायलॉग् येतो. अशा प्रकारे या अटॅचमेन्ट्स् जतन करता येतात / उघडून पहाता येतात.

सुख पुढे वाटे....

लेखक संध्यानंदन यांनी मंगळवार, 10/02/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
फुले चिखलात कमळ नाजुक सुंदर, काटेरी फणसात गरे रसाळ मधुर, दगडधोंडयातून वाहे ठंडगार झरा, ऊस असे कठीन पण रस वाटे बरा, झाड उभे उन्हात पण सावली का गार ? प्रकाशमय सूर्यास जन्म देई अंधार, घाव घातल्यावर
Taxonomy upgrade extras

आणि श्रृती धन्य जाहल्या...

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 10/02/2009 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न सन्मान आज (मंगळवारी) प्रदान करण्यात आला आहे. स्वरांची भक्ती आणि गुरूची कृपा कोणत्याही पुरस्कारहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे या पुरस्काराबाबत भीमसेनजींना काय वाटत असेल, हे सांगणे कठीण आहे. परंतु या सन्मानामुळे अवघ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सन्मान झाल्याची संगीत रसिकांची भावना आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीच भारतरत्न सन्मान त्यांना प्रदान करायला हवा होता. पण त्यांच्या सचिवामार्फत भीमसेनजींचा गौरव करण्यात आला, ही बाब खटकणारी आहे. असो.

खलील जिब्रान हे आपल्या विषयी तर नाही ना म्हणाला?

लेखक मोगॅम्बो यांनी मंगळवार, 10/02/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
कीव करा त्या देशाची, जो तुकड्या तुकड्यात वाटला गेलाय आणि प्रत्येक तुकडा स्वत:ला एक स्वतंत्र देश समजतोय. कीव करा त्या देशाची, जो धटिंगणाला आपला हीरो समजतो आणि त्याचीच संपत्ती लुटून त्याच्यावरच चार तुकड्यांची खैरात फेकणा-या आक्रमकाला दानशूर मानतो. कीव करा त्या देशाची, ज्याचे मुत्सद्दी हे कोल्हे आहेत, तत्वचिंतक हे हातचलाखीचा खेळ करणारे मदारी (juggler) आहेत आणि ठिगळे लावून जोडजाड करणे व पोपटपंची करणे ही ज्या देशाची कला आहे. कीव करा त्या देशाची, जो उगवत्या नेत्याचे तुता-या वाजवून स्वागत करतो.

आनंद शोधतांना..!

लेखक राघव यांनी मंगळवार, 10/02/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना.. तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे! आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा.. तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे.. येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, "आई" तुजलाच अर्पितो मी भवदु:ख मम उरीचे.. आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी? मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे.. आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! काही दिवसांपासून श्रीविठ्ठलाची मूर्ती सतत डोळयांपुढे येत होती. कुठे फोटो दिसेल, कुठे एखादा अभंग ऐकू येईल, कुणी वारकरी भेटेल.. एक ना दोन..! त्यातून स्फुरलेल्या या ओळी.
Taxonomy upgrade extras

पुलं आणि लोकाश्रय ....

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/02/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, आपण जर मराठी साहित्य असे म्हटले तर लगेच "पु ल देशपांडे" हे नाव अग्रक्रमाने पुढे येते. पुलंचे मराठी साहित्यातील योगदान वादातीत आहे ह्यात शंका नाहीच. एक अख्खीच्या अख्खी पिढी "पुलं" ह्या नावावर जगली, वाढली आणि विस्तारली गेली. मराठी माणसाच्या हळव्या मनाचा कोपरा पुलंनी बरोबर पकडला व त्यामुळे त्यांचे साहित्य मराठी माणसाच्या साहित्य प्रकरात मानबिंदु म्हणुन ओळखले गेले ह्यात शंका नाही. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही.

उलटे काळिज...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 10/02/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
उलटे काळिज... बहुतेक लोकांचे ह्रुदय हे त्यांच्या डाव्या बाजुला असते.पण माझ्या वाचनात अशी एक केस आलि कि त्या व्यक्तिचे ह्रुदय उजव्या बाजुला होते..हि केस नेमकि कुठे वाचलि ते मला स्मरत नाहि त्या मुळे मी रेफरंस देवु शकत नाहि या बद्दल मि.पा. सदस्यानि मला क्षमा करावि.. एका गुन्हेगाराला न्यायाधिशांनि फशिचि शिक्षा दिलि..फाशि देण्यापुर्वि जेंव्हा त्याचि वैद्यकिय तपासणी करण्यात आलि त्या वेळी डॉक्टरांना अजब गोष्ट आढळली कि त्याचे ह्रुदय उजव्या बाजुला होते..मग डॉक्टरांनि हि गोष्ट न्यायाधिशाना समजावुन सांगितली.

बोआ काँस्ट्रिक्टर!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 10/02/2009 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या मुलाला बुद्धीबळातले फारसे काही गम्य नाहीये. ह्याला पुढे ह्या खेळात काही भविष्य आहे असे मला वाटत नाही!" आपल्या बुद्धीबळ अकादामीमधे दाखल झालेल्या १२ वर्षाच्या मुलाबद्दल जगज्जेत्या मिखाईल बॉटविनिकने उद्गार काढले! नियतीची खेळी सुद्धा पहा कशी अगम्य असते, हाच मुलगा पुढे अतुलनील जगज्जेता झाला अनातोली कारपॉव आणि बॉटविनिकची भविष्यवाणी खोटी झाली! 'अनातोली' ह्या रशियन नावाचा अर्थ आहे 'सूर्योदय'! किती सार्थ ठरवले ना आपले नाव त्याने? १९५१ मधे पूर्वीच्या सोवियेत रशियामधल्या उराल प्रांतात जन्मलेल्या अनातोलीची बुद्धीबळाशी तोंडओळख झाली ती वयाच्या चौथ्या वर्षी.