नॉस्टॅल्जिया आणि गुलजार...
देशातून राणीच्या देशात आल्यापासून नॉस्टॅल्जिया आणि जुन्या आठवणी पाठ सोडत नाहीयेत.
तसं मला सगळ्या जुन्या गोष्टींचं वेड आहेच... पण समजत नाही मनात इतके जुने संदर्भ कुठे दडून बसलेले असतात आणि असं कुठून काय उफाळून येतं!
गुलजारची गाणी लावली आज खुप दिवसांनी... असं काय उदास लिहितो हा माणूस... असं मन ढवळून निघतं आणि मग तळाशी बसलेलं काही बरं वाइट वर येतं... जुन्या डायरीची पानं चाळल्यासारखं...
थोडं शेवाळ, थोडी माती.. कुठे काचेचे काही रंगीत तुकडे... काही जपून ठेवलेल्या वस्तू ... ज्या ठेवल्या आहेत याचा विसर पडला आहे ... काही अनवधानाने राहिलेलं आणि काळाच्या ओघात खाली बसलेलं ...
मिसळपाव
चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे?)
मला चतुर आणि टाचण्या अधिक आवडायच्या. चतुर बरे. दबकत जाऊन पकडायचे आणि शेपटाला बारीक घागा बांधुन पतंगासारखे उडु द्यायचे.