सांदण
नमस्कार,
साहित्य : १ वाटी तांदूळ ; २ वाट्या बरक्या फणसाचा रस ; गूळ ; वेलची पावडर.
कॄति :
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २ तास वाळवून घ्या.मग त्याचा जाडसर रवा काढून तो चांगला भाजून घ्यावा.
पूर्ण पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे घ्यावे आणि नुसते स्टीलच्या चाळणीवर चांगले घोटून त्याचा रस काढून घ्यावा.
साधारणपणे इडली सारखे होईल इतपत फणसाचा रस आणि तांदळाचा रवा यांचे मिश्रण करुन २ तास भिजत ठेवावे.
मग त्यात व्यवस्थित गूळ घालून तो गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा.
मिसळपाव