Skip to main content

मीलनाची ओढ

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 12/06/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती त्याच्या वाटेकडे डोळे लावुन होती. वाट बघुन शिणली होती असे म्हणण्याइतका वेळ अजुन गेला नव्हता. मात्र त्याच्या येण्याची वेळ जवळ आली तशी ती सवयीने त्याची वाट बघू लागली. मीलनाची स्वप्ने रंगवू लागली. त्या मधुर स्वप्नांत असतानाही तिला चटके मात्र बसतच होते. रविराजाची नजर चुकवायची आजपर्यंत तिला कधीही हिंमत झाली नाही. वडिलांचा दराराच तसा होता. तापट , कडक आणि शीघ्रकोपी. त्यांच्यामोर कुणाचीच धडगत नसते. अशा वेळी तिला हमखास निशेची आठवण व्हायची. निशा आली की रविराज गायब होतात. किंबहुना रविराज दिसेनासे झाले की मगच निशा येते. निशा मायाळू आहे. ती आली की शांत, शितल वाटते.

पाऊस-४

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
तो यायच्या आधी नी येऊन गेल्यावरचं उदासवाणं जग "तो येताच मोहरेल !" म्हणून तर हा विरह सोसायचा !

पाऊस-४

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं !

पाऊस-३

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
तो ही असाच बरसतो बेभान होत माझ्यावर , स्वतः रिकामं होत , मला मात्र मंत्र देतो जगायचा !

पाऊस-२

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणींनी मला चिंब भिजवणारा पाऊस , अवचित् कोरडा होत , डोळ्यांतले थेंब उधार मागायचा !

पाऊस

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस कधी धुसमुसळा - तुझ्यासारखाच वागायचा शांत धुक्याच्या पहाटे तो शृंगारीक होत वा गायचा !

अश्रु

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 12/06/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो डोळ्यात पाणी येत असेल तर अडवू नका, अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार त्यांना जर उगीचच रोखल तर माणूस दगड होईल.

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 12/06/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल. बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले!

पुपुर्झा

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 12/06/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कोणीतरी आपल्या मनात घर करत,कायमचा निवारा नसेलही तो,पण काही काळ तरी आपल मन तिथ रमलेल असत, मनाला वेड लावणारे हे क्षण, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असाही निवांतपणा हवाच ना