अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा
अरे कुणीतरी मला अरे-तुरे म्हणा रे. ही खंत आहे केवळ माझीच नाही, तर मिसळपाववर येण्यार्या कित्येक गावकर्यांची.
मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!)
मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं.
मिसळपाव
हा एक अत्यंत सुंदर (माझ्या मते) असा समुद्राचा फोटो देण्याचा मोह आवरत नाहिये :)

एस्.डी. बर्मन, पत्नी मीरा, पुत्र आर्.डी. बर्मन आणि स्नुषा आशा