इकडचं तिकडचं
नोकरीची सुरवातीची वर्ष मुंबई पुण्यात घालवली. मग काही वर्ष परदेशात काढली. आता इकडे गावी येऊन सेटल झालेय. पण कधी ना कधी काही घटना घडतात आणि जुन्या आठवणी येतात. आठवणी म्हणण्यापेक्षा ते ठिकाण आठवतं. आणि साहजिकच इकडचं नि तिकडंच असं होत राहतं.
आता आजचच घ्या ना. इकडे दोन दिवसापासून मळभ आलय. प्रकाश दिसतो म्हणून सूर्य उगवला म्हणायचा इतकं मळभ येतंय. सकाळी सायकल चालवायला गेले तेव्हा मळभ तर होतच पण हवा पण एकदम कोरडी होती. जरा देखील वारा नाही कि काही नाही. जणू सगळ्या वातावरणाला एक प्रकारची मरगळ आलेय. मला अगदी पटकन परदेशाची आठवण आली. तिकडे ढगाळ वातावरण हे कायमचंच. सनी वेदर म्हणजे लॉटरी.
मिसळपाव
जुन्या काळी पंढरपूरात संत महात्मे वा भक्त रहिवास करित असलेली संत पेठ आणि जुनी पेठ या वसाहती अस्तित्वात होत्या. कालौघात गावाचा वाढता विस्तार आणि ग्राम गरजा लक्षात घेता नगरपरिषदेने नव्या पेठेची उभारणी केली.