काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.
काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे.
मिसळपाव