'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान
'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.
कविता: आज्जी माझी…
आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या
प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला
आज्जी माझी...
मायेची पाखर, उडून गेली दूरवर
परी आठवण नाही पुसली कदापि
आज्जी माझी...
संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले
भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले
आज्जी माझी...
कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले,
डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले,
प्रयत्नांत कधी धडपडले, घडले
परी मी किंचित नाही घाबरले
आज्जी माझी...
आप्तांना भेटण्यास जीव कासावीस
दिसताच पाणावले डोळे आठवणीने
आज्जी माझी...
आत्ता शरीर थकले, आणि कृश झाले
इच्छा संपल्या, उरल्या फक्त स्मृती
आज्जी माझी...
पानगळ सुरू झाली आणि फक्त खोडच उरले
वसंताची चाहुल लागेल, पुन्हा पालवी फुटेल
काव्यरस
राधी आणि मास्तर
बस देवगाव फाट्यावर आली. कंडक्टरने जोरात आवाज दिला, "देवगाव फाटा कोणी आहे का"? कंडक्टरच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला. हातातील पिशवी सावरत बसमधून खाली उतरला. कंडक्टरने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत दरवाजा जोरात बंद केला. बस पुढे निघून गेली. पुढे जाणार्या बसकडे बघत त्याने खांद्यावरची पिशवी सरळ केली. कपडे झटकले.
त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बस वाटेत बिघडली नसती तर आपण वेळेत गावात पोहोचलो असतो, असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या पाटीवर गेले. ' देवगाव तीन किमी'. फाट्यापासून गाव आत तीन किमी होता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.
मोदींनी मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये जाण्याचं काय प्रयोजन असावं?
डिस्कव्हरी हा एक जागतिक दर्जाचा चॅनल असून तो जगभर बघिताला जातो. आणि त्याच चॅनल वर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात. किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत. का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा
खुलं मैदान
एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे.
"साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली?
"बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो.
"गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला.
"गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात."
"चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती.
युगांतर - आरंभ अंताचा भाग १५
राजमाता..... अशक्य आहे हे!"
"तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे."
भीष्माचार्य काहीच बोलेनात.
"तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?"
"होय राजमाता. शब्द आहे माझा."
"पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"'
"राजमाता...."
"राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा?
पावसाच्या धारा
पावसाच्या धारा
--------------------------------------------------------------------------------
पावसाच्या धारा
भन्नाट वारा
टपटप टपटप
पागोळ्या दारा
पोरं घरामध्ये
बसली अडकून
वीज कडाडे
ढगोबा धडकून
लख्ख प्रकाश
आकाश तडकून
पावसाचा तोरा
धिंगाणा सारा
पावसाच्या धारा
पाणी साठले
त्यात खेळू या
धबक धबक
ते उडवू या
पाण्यात होड्या
चला सोडू या
पाण्यात भोवरा
फिरे गरागरा
पावसाच्या धारा
तुडुंब पाणी
वाहते खळाळून
चालावे कसे ?
किती सांभाळुन ?
कागदाच्या होड्या
जाती गोंधळून
पावसाचा जोरा
तडमतडम नारा
पावसाच्या धारा
किती पडतो
कसा पडतो
कधी झरतो
कधी दडतो
कधी हळूच
कधी वाढतो
पावसाचा होरा
कळे ना पोरा
पावसाच्या धारा
------
काव्यरस
विळखा -४
विळखा -४
डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात येऊन सकाळी आठ वाजताच दाखल झालो.माझा एक वर्ग मित्र टाटा मध्ये विभागप्रमुख आहे त्याला फोनकरून सांगून ठेवले होते कि डॉ. पै यांच्याशी बोलून ठेव. नऊ वाजेपर्यंत तेथे १०० एक रुग्णांची गर्दी झाली. यथावकाश त्यांचे सहाय्यक तेथे आले आणि रुग्ण पाहायला सुरुवात केली. आमचा नंबर लवकर आल्यामुळे बराच लवकर लागला.
आणि भारत एका चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीराला मुकला.....
डिस्क्लेमर : हा लेख तद्दन फालतू आहे. आम्ही आमच्या बायकोवर, इथे हवे तितके लिहू शकतो. त्यामुळे स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल
तर अशाच एका शनिवारची गोष्ट आहे. आम्ही आमच्या बाबा महाराजांचे साप्ताहिक दर्शनासाठी गेलो होतो. अर्थात तीर्थ प्राशन करून मग घरी गेलो. तसे नौकानयन न करता, पंख लावूनच घरी गेलो आणि बघतो तर काय. ..घरी बरीच मंडळी जमलेली. आई-वडील तर होतेच, पण शिवाय बायकोची भावंडे पण होतीच. चपला काढून, जेमतेम बसतोय न बसतोय, तोच बायकोचा हुंदका कानावर आला. आता हिला काय झालं, म्हणून नजर वरती केली, तर मातोश्रींनी हातात एक कागद ठेवला. कसाबसा कागद वाचला.
मिसळपाव