अंभईचे वाडेश्वर मंदिर आणि घटोत्कच लेणी ( Wadeshwar Temple, Ghatotkach Cave )
खानदेशाच्या भटकंतीनंतर या भागापासून आपल्याला मराठवाड्याची सफर करायची आहे. अपवाद सोडला तर माझे मराठवाड्यातील बहुतेक भुईकोट पाहून झालेले आहेत, त्यामुळे पुढचे काही महिने तरी या संतांच्या भुमीचीच ओळख करुन घ्यायची आहे. कमी पावसाचा भाग असल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे सरत्या पावसाळ्यात आणि मुख्यतः थंडीमधे इथली भ्रमंती सुसह्य ठरते. औरंगाबाद ( संभाजीनगर ) जिल्ह्यातील लेणी, तीन ज्योर्तिलिंगा, दोन शक्तिपीठांसहित बरीच मंदिरे आणि देवगिरी, माहुरसारखे तुरळक डोंगरी किल्ले सोड्ले तर उत्तमोत्तम भुईकोट असलेल्या मराठवाड्याची भटकंती खुप काही नवीन देउन जाते.
मिसळपाव