Skip to main content

च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

लेखक खिलजि यांनी बुधवार, 23/05/2018 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
च्या मायला बॅट घ्यायची होती हातात अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं पण व्हायचं होतं येगळंच तिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं एकदा का लग्न झाले नक्की समजा झाली तुमची चक्की दळत राहा जात्यावाणी पळत राहा चोरावाणी चंद्र सूर्य मग एक भासतील तारका क्षणात लुप्त होतील सारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील उरलेसुरलेले केसही उडतील जसं जसं कुटुंब वाढेल तुमची "सावित्री "तुम्हास कुटून काढेल थोरामोठ्यांचं बघता बघता आयुष्य सार्थकी लागेल माझे पण असेच काहीसे झाले जास्त जाच नको म्हणून गेलो पोपटवाल्या ज्योतिषाकडे त्याने सांगितल्या प्रमाणे वडाला उलट फेरे मारले गणपतीला अ

राजयोग - २

लेखक रातराणी यांनी बुधवार, 23/05/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - १ त्या दिवसानंतर झोप पूर्ण झाल्यावर किंवा पूर्वदिशेला सुर्यदेवतेचे आगमन झाल्यावरही राजाची सकाळ होत नसे. फक्त त्या दोन भावाबहिणीचे लोभस चेहरे पाहूनच त्यांची सकाळ होत असे. रोज त्या दोघांना फुलं आणून दिल्यांनतरच ते स्नान करीत. हे दोघे भाऊ बहीण घाटावर बसून त्यांना अंघोळ करताना पहात असत. ज्या दिवशी सकाळी ते दोघे येत नसत त्यादिवशी जणूकाही राजांचा पूजापाठ पूर्ण होत नसे. हासि आणि ताताचे आईवडील नाहीत. फक्त एक काका आहेत. काकांचं नाव आहे केदारेश्वर. या लहान मुलांना त्यांचाच आधार आहे. बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं.

"अथातो घाटजिज्ञासा" - भाग १ ला

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 23/05/2018 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेकींग क्षेत्रात 'घाटवाटा' हे प्रकरण थोडे अवघड समजले जाते आणि ते काहीसे खरेही आहे. कारण घाटवाटांच्या डोंगरयात्रांचे मार्गदर्शन होईल अशी कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. जी काही थोडीफार माहिती मिळते ती असे ट्रेक्स करणार्‍या ब्लॉगर्सनी लिहिलेल्या ब्लॉगमधेच. त्यामुळे असे ट्रेक्स करण्यासाठी बहूतेक वेळा स्थानिक लोकांवरच अवलंबुन रहावे लागते. घाटवाटांची इत्यंभुत माहिती मिळाली तरीसुद्धा या प्रकारच्या डोंगरयात्रा अनुभवी आणि चांगली निर्णयक्षमता असलेले सोबती बरोबर असल्याशिवाय कधीही करु नयेत. अशा या घाटवाटांबद्दल समग्र माहिती असलेली पुस्तके माझ्या माहितीत तरी कुठेच उपलब्ध नाहीत.

मा.ल.क.-२

लेखक शाली यांनी बुधवार, 23/05/2018 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावातुन दुसऱ्या गावात जायचे असल्यास मधले काही मैलांचे जंगल पार करुन जावे लागत असे. जंगलातुन जाणारा रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट वनराई, मधेच गवताळ कुरणे, विस्तिर्ण जलाशय, लहाण-मोठ्या टेकड्या. पण रस्ता कितीही सुंदर असला तरी निर्जन होता. त्यामुळे वाटमारी करणाऱ्यांचा हा आवडता परिसर होता. गावातुन रस्ता ज्या ठिकाणी जंगलात शिरायचा तेथे एक टुमदार धर्मशाळा होती. कारण कुणालाही जंगल पार करायचे असले की तो या धर्मशाळेत थांबे. सकाळपर्यंत दोघे-चौघे जमा होत. मग एकमेकांच्या सोबतिने जंगल पार केले जाई. एकट्याने जायची सोयच नसायची दरोडेखोरांमुळे. आषाढाचे दिवस होते.

मी पाहिले ..मी पाहिले

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 22/05/2018 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिले ..मी पाहिले या कथेतील एक नायक एके काळी भारतीय सैन्यात मेजर पदावर असलेला . एका धाडसी मोहिमेच्या वेळी स्फोटात जखमी झाल्याने त्याला आपला एक पाय गमवावा लागतो . नाईलाजाने आपल्या गावात परत येउन तो शेती व्यवसायात जम बसवतो. तरिही मनात कुठेतरी मुख्य प्रवाहापासुन वेगळे पडल्याचे दु:ख त्याच्या मनात आहेच . हे दु:ख आपल्या शेती कामातुन , तर कधी पिण्यातुन तो झाकुन टाकत असतो . पण कधी ना कधी त्याच्या बोलण्यातुन मनातला कडवटपणा बाहेर पडतोच . अजुनही त्याला बरेचजण आदराने मेजर या नावानेच ओळखतात . कथेतील दुसरा नायक आहे मनोहर . शहरातील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या श्रीमंत आई बाबांचा एकुलता एक मुलगा .

नाचणीचे शेंगोळे

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 22/05/2018 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
नाचणीचे शेंगोळे १. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत. २. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी. ३. पॅनमध्ये फोडणी करावी. त्यात आले, लसुण, कांदा , कढीपत्ता , कोरड्या मिरच्या वापराव्यात. नंतर अर्धवट शिजलेली डाळ घलुम्न थोडे घोटावे, पाणी वाढवून शेंगोळे सोडावेत व भरपूर शिजवावेत. शेवटी चिंचेचा कोळ व गूळ घालून हलवुन पुन्हा शिजवावे. sh

माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/05/2018 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन.... 1 मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो... त्यातला एक किस्सा सादर... ...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला.

राजयोग - १

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 22/05/2018 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - प्रस्तावना: रवींद्रनाथ ठाकूर लिखित 'राजर्षी' या हिंदी कादंबरीचा भावानुवाद करण्याचा हा छोटासा प्रयत्न. मायबाप रसिक वाचकांनी तो गोड मानून घ्यावा ही कळकळीची विनंती. रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलं आहे त्या योग्यतेचं लिहिणं आपल्याला शक्य नाही ही मर्यादा माहीत असूनही हे वेडं दु:साहस करतीये. ही कथा वाचताना वाचकांना काही त्रुटी जाणवल्या तर तो सर्वस्वी माझ्या लेखणीतला दोष आहे. लिहायला सुरुवात केल्यानंतर आठवलं की, इथे मिपावरच एका धाग्यात त्रिपुराच्या इतिहासाबद्दल थोडंस वाचायला मिळालं होतं.

Everything , everything

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 21/05/2018 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , चित्रपट समीक्षण वगैरे करण्याइतका मी दर्दी नाही.. त्यातही इंग्लिश चित्रपट --ज्यातले सगळे संवाद नेमके कळाले असतीलच असं नाही.. झरकन जाणारे सगळे सब टाईटल्स सुद्धा १००% वाचले गेल्याची शक्यता नाही. झालंच तर पात्रांची नावं पण विसरलोय (इंटरनेटवर पुन्हा शोध घेता येईल पण कट्ट्यावर गप्पा मारताना कशाला पुन्हा तो खटाटोप).. तर समीक्षण नाही पण एका सुंदर चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटतेय.. ते सांगण्याचा हा प्रयत्न मुळात मी इंग्लिश चित्रपट फारसे बघत नाही..