दोसतार-५
मागील दुवा https://misalpav.com/node/42365
इतक्यात तिसरी घंटा झाली. गजेंद्रगडकर बाई ही वर्गात आल्या. सगळॅ जणगणमन साठी उभे राहिले. संपल्यावर खाली बसले. बाईनी उपस्थिती घेतली. आमच्या डोक्यातून दप्तराचा विषय काही जात नव्हता. समोरचा रिकामा बेंच दुसरे काही सुचूच देत नव्हता.सुदैवाने तो इतिहासाचा तास होता. त्यामुळे वही किंवा पुस्तकाची फारशी गरज पडणार नव्हती. खरेतर इतिहास हा विषय का शिकायचा असतो कोण जाणे. कोणत्यातरी राजाने कोणावर तरी आक्रमण केले आणि कोणाला फाशी दिली, कोणी उठाव करुन कोणाचे मुंडके उडवले....
मिसळपाव