Skip to main content

सोने

लेखक सुवर्णमयी यांनी शनिवार, 05/07/2008 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
सोने अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने! जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने? कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने? निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक- आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने! (नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित) चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2848
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे छान :)

In reply to by धनंजय

सोन्याची वेगवेगळी रूपे आणि रूपके आवडली. असेच म्हणतो !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने व्वा सुंदर.. (५० तोला चा भाव काय होईल) या विचारात पडलेला मदनबाण.....

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे फार आवडलं :) बाकी रुपके मस्ता या धनंजय यांच्या विचारांशी सहमत -('मिसळ'लेला) ऋषिकेश