Skip to main content

सैल धागे

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 06/02/2026 11:09 या दिवशी प्रकाशित केले.

मी: 

शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं, 

स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं... 

चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, 

त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... 

 

ती: 

अंतरातले अंतर मोजताना, 

अंतर काही संपत नाही… (२) 

अंतरात माझ्या पाहताना, 

अंतर तुला तिथेही नाही. 

 

मी: 

 

माळले नवकिरणांनी नभाचे हार, 

रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं... 

बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी, 

तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं... 

 

ती: 

चंद्र विसावला अंतरी तरी, 

अंतरात हे कसले अंतर? 

अंतरात खोल दडले, 

तुझे माझे सैल धागे 

 

- शब्दमेघ (६ फेब्रुवारी २०२६)

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 544
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... अहाहा..! सुंदर कविता आवडली. काही तरी राहून गेलं अशा आशयाची कविता थेट पोहोचली. प्रेमात काही राहून जाण्याची हुरहूर आंनदायी असते. अपूर्व राजपूत या कवी मित्राच्या चार ओळी टाकण्याचा मोह होतो. याच एका विचारात पुन्हा भिजली गे दिठी युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी -दिलीप बिरुटे ( गोड मिठीतला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युगे लोटली लोटली कान्हा राहिली रे मिठी.. काय सुंदर ओळी... मी कधीच असा विचार केला नव्हता, वा

अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही.

खूप दिवसांनी मिपा वर आलो, आणि कविता पाहिली तर ती गद्य लिखाणा सारखी सरळ होती...

 

म्हणून नीट करता आले का पाहिले तर संपादन करता आले... परंतु वर आला धागा..

 

क्षमस्व