युद्ध बखर
लेखनविषय:
युद्ध बखर |
ताजी खबर |
इराण 'खार्ग' |
समृद्धी मार्ग ||
तेलसाठा बेट |
हमला हा थेट |
स्ट्रेट हॉर्मुझ |
माझं ना तुझं ||
रथी लारीजानी |
आणि सुलेमानी |
ठोकले दोघांना |
या एकाच दिनी ||
तो ट्रम्प अहंकारी |
कंटाळले सहकारी |
फेकले राजीनामे |
नको तुझी कामे ||
इकडे मोदी, जयशंकर गद्दी |
3 तेल जहाजे, आणली मुसद्दी ||
हा युद्ध ज्वरा |
ना संपे त्वरा |
आग विझेल तेव्हा |
तेल संपेल जेव्हा ||
१७ मार्च २०२६
वाचन
61
प्रतिक्रिया
2
छान आहे कविता
काळसुसंगत आहे.
हं
छान आहे.
-दिलीप बिरुटे