Skip to main content

अराजकीय घडामोडी - सप्टेंबर २०२३

लेखक निनाद यांनी बुधवार, 13/09/2023 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक बातम्या
  • मोरोक्को मध्ये भूकंप अनेक ठार
  • युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना धमकी दिली आहे की जर शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला तर त्या देशात राहणारे लाखो युक्रेनियन हिंसक होऊ शकतात.
  • लीबिया हा जागतिक पटलावर विसरून गेलेला देश आहे. पण लीबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. तेथे अचानक आलेल्या पुरामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • विमानच बंद पडल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात अडकले आहेत.
  • अ‍ॅपलने नवीन फोन मॉडेल आयफोन १५ रिलीज केले आहे. आता USB-C चा वापर यात केला गेला आहे.
  • भारतातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हनोई येथे पोहोचले आहेत. आता व्हिएतनामसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे. चीनी कारखान्यांना पर्याय म्हणून व्हिएतनाम वेगाने पुढे येत आहे.

वाचने 12671
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

मायक्रॉन टेक्नॉलॉजीजने टाटा प्रोजेक्ट्स सोबत भागीदारीत गुजरात मधे सेमीकंडक्टर चीप असेंब्लींग आणि टेस्टींगच्या प्लँटचे काम सुरू केल्याचे समजते. हा व्यवहार २.७ बिलियन डॉलरचा असणार आहे. दोन भागांत होणाऱ्या या प्रकल्पातील पहिला भाग २०२४ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षीत आहे. बातमी: https://indianexpress.com/article/business/micron-begins-construction-o…