Skip to main content

(भा SSSSS सं भा SSSSS सं)

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 13/01/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सो...हम....सो...हम!! उपाकर मित्रमंडळींनो, `खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. खरड वहीत तर फिरकलो नव्हतोच, पण व्यानिलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे ." ऐसी लक्तरे लोळवीन" .निर्मात्या आहेत जिल्बुषा नगरकर आणि भावी संपादक (भा सं )मीच आहे . गेले काही महिने, वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा उसळपाव वर आहे का हो?, सर्व कट्टे तो भरवतो कहो ? ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. उसळपाव .कॉम , असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो. आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!! आपलाच (भा .सं) खाईन मांडे
लेखनविषय:

वाचने 14348
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

>>बुवांनी हा धागा वर आणाण्याचे प्रयोजन कळले नाही. असेच म्हणतो. -संशयी सूड

In reply to by सूड

@दु दु मी नाय>>> :-/ तू पण..तू पण!!! :-/ मला अठवला हा (दंगाhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif) धागा... पां डुब्बाचा! हेच कारण पुरे सं नै का??? :-/ आणि नसलं तर नसू दे... :-/ ज्जा!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-050.gif