Welcome to misalpav.com

कॉपीराईटचे अर्थकारण आणि माझी (स्वतःची) दुटप्पी भूमीका !

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स आणि कॉपीराइट कायद्यांचा उद्देशच हा आहे की, सर्जनशीलतेस निव्वळ दाद नको तर त्या आधारावर आर्थीक उत्पन्नाच्या शक्यता सुद्धा असाव्यात ज्यामुळे नवीन संशोधन आणि सर्जक विचारांची समाजात जोपासना आणि वृद्धी व्हावी. विकिपीडियावर सुद्धा प्रताधिकारांची नवागत संपादकांनी बुजराखावी म्हणून कन्व्हिंसींग साठी बर्‍या पैकी आटापिटा चालू असतो. खास करून विवीध विभूतीभक्त आणि विशीष्ट विचारांनी (चष्म्यांनी) प्रेरीत प्रचारकांना समजावणे सर्वात कठीण असल्याचा सर्व साधारण अनुभव असतो.


कर्तृत्व

लेखक: टीपीके | प्रसिद्ध:
माझी मुलगी ११ वर्षांची आहे, काल तिच्याशी बोलताना सहज काही विषय निघाला आणि तिला मी २-३ मिनिटात एक एक करून जयदेव पायेंग , बाबा आमटे, प्रकाश आमटे, बंकर रॉय, पोपटराव पवार यांच्या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी काय काम केले, कशा परिस्थितीत केले, त्याने कोणाला काय फायदा झाला इत्यादी इत्यादी. हेतू हा की तिला सध्या वेगळे काम करणाऱ्या लोकांची ओळख व्हावी आणि थोडे इन्स्पीरेशन मिळावे. या गोष्टी मी मला त्यांचे काम जसे आठवेल तसे सांगितले,त्यातील काही बरोबर,काही चूक तर काही अर्धवट असेल,पण तिला या गोष्टी आवडल्या. टेड वरचा बेअरफुट कॉलेजचा व्हिडिओ पण दाखवला.


रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात.


संस्कृत सुभाषिते -२

लेखक: शरद | प्रसिद्ध:
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्‍यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे ! मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !! (कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर) असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.


कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?


कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!

लेखक: खेडूत | प्रसिद्ध:
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला! अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.


जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!

लेखक: गवि | प्रसिद्ध:
जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे. लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत. अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११.